तीन दिवसांच्या सुट्टीनंतर, आज १५ एप्रिल २०२५ रोजी शेअर बाजाराने मोठी उसळी घेतली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांची चांगलीच चांदी झाली आहे.
सोमवारी आंबेडकर जयंतीनिमित्त व्यवहार बंद होते आणि त्यापूर्वी सलग दोन आठवड्यांच्या सुट्ट्या होत्या. पण मंगळवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदार चांगेलच खुश झाले.
सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसला. यानंतर काही प्रमाणात स्थिरता आली पण तीरीही सेन्सेक्स वरच्या दिशेनेच जात होता. आता सेन्सेक्स 76,734.8 च्या आसपास व्यवहार करताना दिसत आहे. तर दुसरीकडे, निफ्टी देखील हिरव्या रंगात व्यवहार करत आहे. निफ्टी आता 23,328.55 च्या आसपास व्यवहार करताना दिसला.
शेअर बाजारात अचानक उसळीचे कारण ट्रम्प सरकराने सध्या थांबवलेले टॅरिफ कर. ट्रम्प सरकराने ९० दिवसांसाठी टॅरिफ कर थांबवण्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजरात तेजी दिसून येत आहे. अमेरिकेच्या शेअर बाजरातही अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. अमेरिकन शेअर बाजारातील सर्व शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले आहेत.
निफ्टीमध्ये खरेदीचे वातावरण
निफ्टीमध्ये सतत खरेदी दिसून येत आहे, विशेषतः बँकिंग, ऑटो आणि आयटी क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली हालचाल दिसून येत आहे. गुंतवणूकदार या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पुढे बाजार आणखी वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
भविष्यातही हीच गती कायम राहील का?
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, या आठवड्यात ही गती कायम राहील का? जर परदेशी बाजारपेठेतून पाठिंबा मिळत राहिला आणि राजकीय वातावरण स्थिर राहिले तर बाजार नवीन उंची गाठू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जरी नेहमीच काही चढउतार असतात, परंतु सध्या बाजार वरती जाण्याचे चिन्ह आहे.
तीन दिवसांच्या सुट्टीनंतर बाजाराने ज्या पद्धतीने जोरदार पुनरागमन केले आहे ते या आठवड्यात गुंतवणूकदार सक्रिय राहण्याचे संकेत देत.