वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता पश्चिम बंगाल भाजप युनिटचे अध्यक्ष आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांनी पश्चिम बंगाल सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या स्थितीत राज्य पोलिस काहीही करत नसून केंद्रीय दलांनाही राज्य सरकारकडून मदत मिळत नाहीये. जोपर्यंत ममता बॅनर्जी इच्छित नाहीत तोपर्यंत राज्यातील हिंसाचाराच्या घटना कमी होणार नाहीत. असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. एका वृत्तवहिनीला मुलखात देताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पुढे त्यांनी असंही म्हंटल आहे की , ‘ममता बॅनर्जी आपली ताकद दाखवत आहेत. याचे कारण म्हणजे कोलकाता आणि पश्चिम बंगालमधील इतर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वक्फ मालमात्तेवर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. या गोष्टींकडे लक्ष जाऊ नये यासाठी येथे आंदोलन सुरु आहे.
पुढे त्यांना भाजप ध्रुवीकरणाच राजकारण करत आहे का? या विरोधकांच्या प्रश्नाबद्दल विचारले असता भाजप नेते म्हणाले की, ‘भाजप राज्याचे ध्रुवीकरण करू इच्छित आहे हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. जर बंगालमध्ये ध्रुवीकरण झाले तर त्याचा फायदा भाजपला नाही तर तृणमूल काँग्रेसलाच होईल. बंगालमध्ये मुस्लिमांचे १०० टक्के ध्रुवीकरण झाले आहे, तर हिंदूंचे ध्रुवीकरण झालेले नाही. त्यांनी असेही म्हटले की, ‘ही दंगल मुस्लिम बहुल भागात झाली. हिंदू भागात दंगली झालेल्या नाहीत. त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि आमदार आहेत.’
दरम्यान, सुकांता मजुमदार यांनी असाही आरोप केला आहे की, केंद्रीय दलांना राज्य सरकारकडून मदत मिळत नाही. त्यांना दंगलग्रस्त भागात जाण्यापासून रोखले जात आहे. परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचा राज्य सरकारचा दावा त्यांनी खोटा आहे.’