Hapus Mango: गुढीपाडव्याच्या सुमारास हापूस आंब्याचे दर गगनाला भिडले होते. अर्थातच गेल्या पंधरावड्यात हापूस आंब्याचे दर 1200 रुपये प्रति डझनपर्यंत पोहोचले होते. मात्र आता आवक वाढल्याने हापूस आंब्याच्या किमतीत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हापूस आंबा प्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या पंधरावड्यात १२०० रूपये डझन असणारा आंबा आता ८०० रूपयांनी कमी झाला आहे. आता हापूस आंबा 400 रुपये प्रति डझनपर्यंत मिळत आहे. आता अनेक ठिकाणी गुणवत्तेनुसार हापूस आंबा 400 ते 800 रुपये प्रति डझन या दरात विक्रीस उपलब्ध आहे. आवक वाढल्याने आणि मागणी स्थिर राहिल्याने दरामध्ये मोठी घट झाल्याचे बाजार अभ्यासक सांगत आहेत.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात आवक जास्ती वाढल्यास हापूसचे दर आणखी कमी होऊ शकतात.
हापूसचे दर कमी झाल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता सामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात हापूस आंबा उपलब्ध आहे. परंतु काही ठिकाणी अजूनही उच्च दराने विक्री सुरू असून त्यामुळे ग्राहकांनी विचारपूर्वक खरेदी करण्याचा सल्ला व्यापारी देत आहेत.
दरम्यान, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेचा मोठा सण आहे. या सणाला आंब्याचे विशेष महत्व आहे. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या आसपास हापूस आंब्याचे दर कसे राहतात ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु सध्या मात्र हापूस आंब्याच्या दरात घट झाल्याने हापूस आंबा प्रेमी आनंदी आहेत.