अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. ज्यामुळे फक्त अमेरिकेलाच नाही तर जगाला धक्के बसले आहेत. अशातच त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच हार्वर्ड विद्यापीठाला दिले जाणारे २.२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक अनुदान थांबवले आहे.
हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारच्याकाही मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला असल्याने व विद्यापीठाच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठाला दिले जाणारे अनुदान थांबवले आहे.
दरम्यान, ट्रम्प सरकराने विद्यापीठाचे अनुदान थांबवल्यानंतर आणखी एक निर्णय घेत विद्यापीठाला धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी हार्वर्ड विद्यापीठाला एक राजकीय संस्था मानून विद्यापीठाला मिळणाऱ्या कर सवलतीतून वगळले जाईल अशी धमकी दिली आहे.
खरं तर हार्वर्डने ट्रम्प सरकाराच्या धोरणात्मक बदलांना स्वीकारण्यास नकार दिला होता. ज्यामुळे ट्रम्प यांच्याकडून एका मागून एक कारवाई विद्यापीठाविरोधात करण्यात येत आहे.
जर विधापीठाला सरकारची धोरणे मान्य नसतील तर त्यांना करमुक्त दर्जा कायम ठेवण्याचा अधिकार नाही व त्यांनी एक राजकीय संस्था म्हणून कर भरावा, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांची पोस्ट
https://truthsocial.com/@realDonaldTrump/114342374504628520
सोशल मीडिया नेटवर्क ट्रुथवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, ‘करमुक्तीचा दर्जा पूर्णपणे सार्वजनिक हितासाठी काम करण्यावर अवलंबून आहे. जर हार्वर्ड विद्यापीठ राजकीय, वैचारिक आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या विचारांना प्रोत्साहन देत राहिले तर त्यांची कर सवलत मागे घेतली जाईल.’
ट्रम्प यांनी विद्यापीठाला कोणते आदेश दिले होते?
ट्रम्प प्रशासनाने ३ एप्रिल राजी विद्यापीठाला एक नोटीस सादर करत सांगितले होते की, ‘हार्वर्ड विद्यापीठ परिसरात ज्यूविरोधी भावना आणि भेदभाव होताना दिसत आहे. या विरोधात पावलं उचलण्यात यावी. त्याच सोबत विद्यापीठाचे प्रशासन, भरती प्रक्रिया, प्रवेश प्रक्रिया यात बदल करण्यात यावे.
मात्र, हार्वर्ड विद्यापीठाने ट्रम्प सरकारच्या या मागण्या नाकारल्या आहेत. विद्यापीठाने म्हटले आहे की व्हाईट हाऊस त्यांच्यावर ‘नियंत्रण’ ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.