अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी व इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या या कारवाईचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्ते देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने करणार आहेत.
काँग्रेसच्या प्रदेश समितींनी राज्यातील ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना जमवून निदर्शने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसला राजकीय हेतूने निशाणा बनवण्यात येत असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र, याचा सामना देखील पक्ष मोठ्या ताकतीने कारेन असे देखील काँग्रेकडून म्हंटले जात आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपत्रात काय?
नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीने एजेएलची ६६१ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ९०.२ कोटी रुपयांचे शेअर्स जप्त केले होते. त्यामधून शेअरची विक्री होऊ नये, असा हेतू होता. यंग इंडियनने एजेएलच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे खूप कमी किंमतीत विकत घेतल्याचा ईडीने दावा केला. ईडीने काँग्रेसशी संबंधित नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी (एजेएल) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी केली. ईडीनं जप्त केलेल्या ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेच्या प्रकरणात नोटीस बजावली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी ईडीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईडी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.