अमेरिकेने आता चीन वर २४५ टक्के टॅरिफ कर (आयात कर) लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने चीनवर यापूर्वी १४५ टक्के कर लादले होते. पण चीनने देखील अमेरिकेवर टॅरिफ कर वाढवण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेकेकडून हे पाऊल उचण्यात आले आहे. चीनने अमेरिकेवर १२५ टक्क्यांपर्यंत कर लादण्याची घोषणा केली होती.
दुसरीकडे अमेरिकेने चीन वगळता भारतासह सर्व देशांवर लादलेले टॅरिफ शुल्क ९० दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली आहे. इतर देश अमेरिकेसोबत टॅरिफवर चर्चा करतील आणि काहीतरी मार्ग काढतील असं चिन्ह दिसत आहे. पण चीनच्या बाबतीत अमेरिकेची भूमिका टॅरिफला टॅरिफने उत्तर अशी आहे.
खरं तर जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी तारिफ शुल्क लादण्याची घोषणा केली आहे तेव्हापसून चीन अमेरिकेच्या या निर्णयाचा विरोध करत आहे. तसेच अमेरिकेने टॅरिफ मागे घ्यावे यासाठी चीन अमेरिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण दुसरीकडे अमेरिकेला याचा काहीच फरक पडत नाहीये. उलट चीनच्या प्रत्येक कारवायांना अमेरिका टॅरिफ कर वाढवून उत्तर देत आहे.
अमेरिकेचे असे म्हणणे आहे की, चीनचा दृष्टिकोन हट्टी आहे, तर जगातील सुमारे ७५ देशांनी व्यापार करारासाठी अमेरिकेशी संपर्क साधला आहे. आणि म्हणून अनेक देशांवरील शुल्क ९० दिवसांसाठी पुढे ढकलले आहे. या काळात यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत टॅरिफ शुल्क आहे १० टक्के आकारला जाईल. असं सांगण्यात आलं आहे.