इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ३२ व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. या सिजनमधला हा पहिलाच सुपर ओव्हर सामना होता, ज्यात दिल्लीने बाजी मारली. सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरकडे वळवण्यात आला. ज्यात दिल्लीच्या बॉलर्सनी कमाल दाखवली.
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, दिल्लीने केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सच्या मदतीने संदीप शर्माच्या अवघ्या ४ चेंडूत हे लक्ष्य गाठले. या विजयासह, दिल्लीने १० गुणांसह गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावून १८८ धावा केल्या.
Come for the winning hit, stay for the celebration 😮💨pic.twitter.com/2vL2Yq9Y4y
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 16, 2025
दिल्लीने दिलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात वादळी झाली. कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जोडीने मोठी धावसंख्या उभारली. मात्र, सॅमसन आऊट होऊन तंबूत परतल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांना काही खास कामगीरी करता आली नाही.
अशास्थितीत राजस्थानला २० षटकांत फक्त १८८ धावाच करता आल्या. हा सामना बरोबरीत सुटल्याने सामना सुपर ओव्हरकडे वळला, जिथे दिल्लीने अगदी शेवटच्या क्षणी विजय मिळवला.