सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन आघाड्या आहेत. आता या दोन आघाड्यांसमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी तिसऱ्या आघडीची चर्चा सुरु आहे. अशास्थितीत राज्याच्या राजकरणात पुन्हा भूकंप येण्याची दाट शक्यता आहे.
राज्यात तिसरी आघाडी आणण्यासाठी व दोन आघाड्यांसोमर आव्हान उभे करण्यासाठी राजू शेट्टी, बच्चू कडू व महादेव जानकर हे तीन बडे नेते एकत्र आले आहेत. या नव्या राजकीय आघाडीचा प्रथम मेळावा येत्या रविवारी पुण्यात ‘युवा संघर्ष निर्धार परिषद २०२५’ च्या माध्यमातून होणार आहे. या मेळाव्यात बच्चू कडू तिसऱ्या आघाडीचा मोठा निर्णय जाहीर करू शकतात. असे बोलले जात आहे. अशातच जर राज्यात तिसरी आघाडी स्थापन झाली तर कोणाला सर्वात जास्त फटका बसू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत.
राज्यात तिसऱ्या आघाडीचा परिणाम कोणावर होणार ?
राज्यात जर तिसरी आघाडी स्थापन झाली, तर त्याचा फटका महायुती तसेच महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांना बसू शकतो. पण सर्वात जास्त फटका महायुती मधील मोठा पक्ष भाजपला बसू शकतो. कारण राजू शेट्टी हे पश्चिम महाराष्ट्रात आपला दबदबा ठेवून आहेत. त्यामुळे त्यांना तिसऱ्या आघाडीचा पर्याय मिळाला तर त्याचा सर्वाधिक फटका महायुती सरकारमधील अजित पवारांना बसेल. महादेव जानकर आजच्या घडीला धनगर समाजाचे नेते म्हणून गणले जातात. त्यांच्यामुळे बहुसंख्य धनगर समाज भाजपकडे झुकला होता. त्याचा फायदा भाजपला झाला पण ते तिसऱ्या आघाडीत गेले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. तर बच्चू कडू यांचा ग्रामीण भागात ठसा आहे. अशास्थितीत जर आपण पाहायला गेलो तर विदर्भातला नेता, कुणबी समाज, प्रहार संघटचे राज्यभर नेटवर्क याचा तोटा भाजपला होऊ शकतो. म्हणून प्रथमदर्शी त्याचा तोटा भाजपलाच होईल असंच दिसतेय.