देशात सध्या वक्फ सुधारणा कायद्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. केंद्र सरकार म्हणत आहे की, हा कायदा मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी आहे. मात्र, काँग्रेस आणि इतर अनेक विरोधी पक्ष तसेच काही मुस्लिम संघटना याचा विरोध करत आहेत.त्यांचे म्हणणे आहे की, हा कायदा मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. वस्तुतः सर्वच मुस्लीम नेत्यांनी या कायद्याला विरोध केला आहे.असे नाही.तर अनेकांनी याचे समर्थन देखील केले आहे.
याच वादाच्या पार्श्वभूमीवर, १७ एप्रिल रोजी दाऊदी बोहरा समाजाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले या कायद्यात झालेल्या बदलांमुळे त्यांच्या समाजाच्या जुन्या मागण्या पूर्ण झाल्या, असे त्यांनी सांगितले. त्यांनी मोदींच्या “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या धोरणावरही आपला विश्वास व्यक्त केला.पंतप्रधान मोदींनीही बोहरा समाजाच्या योगदानाचे कौतुक केले आणि सांगितले की, सरकार सर्व समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे
दाऊदी बोहरा समुदाय के एक प्रतिनिधिमंडल ने आज प्रधानमंत्री मोदी से मुलाकात की और वक्फ संशोधन अधिनियम के लिए उनका आभार जताया।
उन्होंने कहा कि यह समुदाय की लंबे समय से लंबित मांग थी। उन्होंने प्रधानमंत्री के 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' के दृष्टिकोण पर भरोसा जताया। pic.twitter.com/H8nwGyg8GL
— ANI_HindiNews (@AHindinews) April 17, 2025
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात या कायद्याविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी झाली. न्यायालयाने सध्या कायद्यावर कोणतीही स्थगिती (stay) देण्यास नकार दिला आहे. मात्र, पुढील आदेश येईपर्यंत वक्फ बोर्डात कोणतीही नवीन नेमणूक होणार नाही असे सांगितले आहे. केंद्र सरकारला यावर उत्तर देण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.