पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांच्याशी फोनवरून विविध मुद्द्यांवरून चर्चा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘मस्क यांच्याशी फोनवर विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या वर्षीच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या बैठकीत आम्ही ज्या विषयांवर चर्चा केली होती त्या विषयांवर देखील चर्चा झाली. नवोन्मेष, अवकाश संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकास या क्षेत्रातील भारतीय आणि अमेरिकन संस्थांमधील सहकार्य मजबूत करण्याबाबत देखील चर्चा झाली असलयाचे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1913129902100090992
दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले होते. या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच उद्योगपती एलन मस्क यांना देखील पंतप्रधान भेटले होते. या भेटीत पंतप्रधान आणि मस्क यांच्यात नवोन्मेष, अवकाश संशोधन आणि टेस्लाच्या विस्तार योजनांवर चर्चा झाली होती.
मस्क यांची टेक कंपनी टेस्ला भारतात प्रवेश मिळवण्यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्न करत आहे. याच काळात पंतप्रधान आणि त्यांच्यात फोनवर संवाद होणे हे संकेत भविष्यात मस्क यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात.