मुर्शिदाबादमधील हिंसाचारावर बांगलादेशने केलेल्या विधानावर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बांगलादेशने या हिंसाचारात स्वतःचा कोणताही संबंध नाही, असे सांगितले होते. त्यावर भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी उत्तर देताना, “बांगलादेशने आधी स्वतःच्या देशाकडे पाहावे आणि आमच्या देशांतर्गत विषयात ढवळाढवळ करण्याची गरज नाही,” असे म्हटले आहे.
मुर्शिदाबादमधील हिंसाचार वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनामुळे झाला. या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू झाला आणि १० जण जखमी झाले. या संपूर्ण जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून प्रशासनाने इथली इंटरनेट सेवा बंद केली आहे.
बांगलादेशने या हिंसाचारात अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले होते. त्यावर भारताने प्रतिक्रिया देताना, बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली पण त्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना चांगलेच सुनावले आहे. “बांगलादेशने अशा अनावश्यक टिप्पण्या करून सद्गुणी असल्याचा आव आणण्याऐवजी स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणं अधिक गरजेचं आहे.” असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले आहे.
गेल्या काही वर्षात बांगलादेशातून भारतात आलेल्या शेकडो अनधिकृत घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले. तेंव्हा एक गंभीर गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे हे घुसखोर कामाच्या शोधात भारतात आले होते. आता जर का त्यांना आपला देश सोडून पोटापाण्यासाठी भारतात यावे लागत असेल तर बांगलादेशसाठी शरमेची गोष्ट आहे. मात्र असे असताना स्वताच्या परिस्थितीकडे लक्ष द्यायचे सोडून भारताच्या अंतर्गत गोष्टीत लुडबुड करण्याच्या सवयीमुळे त्यांना भारताकडून अपमानित व्हावे लागले.
आता या वादामुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असला तरी दोन्ही देशांनी शांतता आणि समजुतीने वागण्याचे आवाहन करण्यात येत आहे.पण आधी बांगलादेशाने भारतातील अल्पसंख्यांकांचा विचार करण्याऐवजी बांगलादेशातील ल्पसंख्यांकांचा विचार करावा असे बोलले जात आहे.