पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. पुण्यातील सर्वात लोकप्रिय पूल अर्थात भिडे पूल पुढील काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता जे नागरिक भिडे पुलाचा वापर रोजच्या प्रवासासाठी करत आहेत त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. भिडे पुलावरून रोज हजारो गाड्या ये-जा करतात अशातच हा पूल आता काही दिवस प्रवासासाठी बंद केला असून, प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. भिडे पूल किती दिवस बंद राहणार आहे? पाहूया….
पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना या मेट्रो स्टेशनच्या बाजूला असलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्यामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी पुढील दीड महिने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागातून तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने वाहने भिडे पुलावरून ये-जा करतात. अशास्थितीत आता या प्रवाशांचे हाल होणार हे नक्की.
पुणे मेट्रोच्या पादचारी पुलाचे काम सुरू असल्याच्या कारणास्तव भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तब्बल दीड महिना पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पुणेकरांची गैरसोय न व्हावी यासाठी वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे. दरम्यान, भिडे पूल अचानक बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.