राज्यातील सर्वात लोकप्रिय लाडकी योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना १५०० रुपये दिले जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही रक्कम सरकारकडून देण्यात येते. गेल्या महिन्यात महिलांना दोन महिन्यांचा एकत्र हप्ता मिळाला होता. म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले होते. आता एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला असताना महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे.
जर आपण मागच्या हप्त्यांबद्दल बोललो तर लाडकी बहीण योजनेतील मागील हप्ते विशेष प्रसंगांच्या दिवशी वितरित करण्यात आले होते. उदाहरणार्थ, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते महिला दिनाच्या (8 मार्च) पूर्वसंध्येला लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता देखील खास प्रसंगी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यात अक्षय्य तृतीया हा शुभ सण आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता याच शुभ दिवशी म्हणजेच 30 एप्रिल ला खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा २५ ते ३० तारखे दरम्यान टप्प्या-टप्प्याने पैसे खात्यात येऊ शकतात.
दरम्यान, राज्य शासनाकडून योजनेच्या लाभार्थ्यांची सातत्याने तपासणी केली जात आहे. या योजनेमध्ये पात्र नसलेल्या महिलांना अपात्र ठरवून त्यांची नावे यादीतून वगळली जात आहेत.