Donald Trupm:डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर विराजमान होताच विविध निर्णय घेतले होते. त्यातीलच एक निर्णय म्हणजे ज्यांचे पालक कागदपत्रे नसताना आणि अस्थायी व्हीसा घेऊन अमेरिकेत राहत आहेत, अशा पालकांची मुले अमेरिकेत जन्माला आली तरी त्यांना अमेरीकन नागरिकत्व मिळणार नाही. या आदेशामुळे अमेरिकेत जन्मलेल्या काही मुलांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
मात्र आता ट्रम्प सरकारच्या या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कारण त्यांच्या वादग्रस्त नागरिकत्व आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. ट्रम्प सरकारचा निर्णय कायद्याच्या विरुद्ध आहे, असे अनेकांचे मत होते. कारण अमेरीकेच्या संविधानानुसार, जो कोणीही अमेरिकेत जन्मलेला असेल आणि अमेरिकी कायद्यांच्या अधीन असेल तो अमेरिकेचा नागरिक मानला जातो.
आता या प्रकरणी पुढील सुनावणी मे महिन्यात होणार आहे. तोपर्यंत हा आदेश स्थगित राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दरम्यान या आदेशाविरोधात देशभरातून अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. कनिष्ठ न्यायालयांनी या आदेशाला यापूर्वीच स्थगिती दिली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही या आदेशाला स्थगिती दिल्याने ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, ट्रम्प सत्तेवर विराजमान झाल्यापासून अत्यंत आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.त्यांनी आजपर्यंत जे विविध निर्णय घेतले आहेत, त्यामुळे अनेक देशांना धडकी भरली आहे. त्यांनी पनामा कालवा, ग्रीनलॅंड, कॅनडावरती ताबा मिळवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. तसेच आता त्यांनी अनेक देशांच्या करामध्ये वाढ केली आहे.