महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यातील पिंपरी चिंचवड उपनगरात क्रांतिकारी चापेकर बंधूंना समर्पित स्मारकाचे उद्घाटन केले आहे. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करण्यात आला आहे. क्रांतिवीर चापेकर बंधू स्मारकाचे लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रमात बोलत असताना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या शौर्याला ही “खरी श्रद्धांजली” असल्याचे म्हटले आहे. सोबतच प्रत्येकाने हे स्मारक पाहायलाच हवे, असे प्रतिपादन देखील केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात म्हणाले की, ‘क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकामध्ये तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करण्यात आला आहे. चापेकर बंधूंच्या जीवनातील चौदा प्रसंग इथे पाहायला मिळतात. त्यासाठी अतिशय सुंदर पुतळे तयार करण्यात आले असून ते बघितल्यावर प्रत्यक्ष ती व्यक्तीच तिथे बसली आहे, असे वाटते. यासोबतच हा परिवार, त्यांचे संस्कार, विचाराची पद्धत या सगळ्या गोष्टी इथे पाहायला मिळतात.’
“लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हजारों क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. त्यांच्या सळसळत्या रक्तामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची अर्चना तयार केली. टिळकांनी मांडलेला हा विचार चापेकर बंधूंच्या डोक्यात जाऊन बसला आणि यातूनच त्यांनी गोंद्या आला रे आला अशा घोषणा देऊन रँडची हत्या केली. चापेकर बंधू पकडले गेले नसते. पण आपल्याकडे फितुरांचा इतिहास असून तिथेही अशीच फितुरी झाली आणि ते पकडले गेले. पण त्यानंतरही चापेकर बंधूंचा लढा सुरु राहिला. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रँडची हत्या ही क्रांतीकारकांच्या इतिहासात वॉटरशेड मुव्हमेंट आहे. त्यातून इतिहास पूर्णपणे बदलला. दुर्देवाने केवळ बोटांवर मोजण्या इतक्या क्रांतीकारांच्या गाथा आपल्याला माहिती होत्या. पण पंतप्रधान मोदीजींनी देशभरातील साडेबारा हजार क्रांतीकारकांच्या कथा आणि गाथा शोधून काढत आपल्यापर्यंत पोहोचवल्या,” असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
From the legacy of the Krantiveer Chapekar Brothers to the triumphs of Maharashtra’s athletes and the unveiling of Maharana Pratap's Ashwarudh Statue, a spirit of courage, excellence, and progress is shaping the path toward a brighter future.
इतिहासाच्या गाभ्यातून आधुनिकतेकडे… pic.twitter.com/0FvB29Ljvc— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 19, 2025
दरम्यान, या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकातं पाटील, मंत्री जयकुमार रावल, अण्णाजी बन्सोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.