Beed News: बीड जिल्ह्यातील सायबर गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले सध्या एका गंभीर प्रकरणात अडकले असून त्याला निलंबित करण्यात आले आहे. कासलेवर खंडणी मागणे, अनधिकृतपणे संशयितांना गुजरातला घेऊन जाणे यांसारखे आरोप आहेत. निलंबनानंतर रंजित कासलेने दावा केला आहे की, वाल्मिक कराडचा एन्काउंटरच्या करण्याची ऑफर धनंजय मुंडेंनी त्याला दिला होती, त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
निलंबनानंतर तो काही दिवस फरार देखील होता. परंतु नुकतीच त्याला बीड पोलिसांनी अटक केले आहे. कासले याने नुकतेच म्हटले आहे की, त्याला वाल्मिक कराड याच्यावर २४ तास पाळत ठेवण्यास आणि रिव्हॉल्व्हर जवळ बाळगण्यास सांगण्यात आले होते. या कामासाठी त्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवण्यात आला असल्याचा दावाही त्याने केला आहे. माझी उर्वरित २५ वर्षांची नोकरी असेल आणि त्यात माझा पगार १५ कोटी होत असेल, तर तुम्हाला एकरकमी ५० कोटी रुपये मिळतील, असे कासलेने सांगितले आहे. तसेच नंतर चौकशी लागली तरी आमचेच सरकार असेल आणि आम्ही तुम्हाला त्यातून निर्दोष बाहेर काढू, असे आश्वासनही या ऑफरमध्ये समाविष्ट होते, असा दावा कासलेने केला आहे.
कासलेने यापूर्वी मुंडेंवर निवडणुकीत ईव्हीएमपासूनदूर राहण्यासाठी १० लाख रुपये दिल्याचा आरोपही केला होता. आता यावरती निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. निवडणूक आयोगाने याबाबत एक प्रसिद्धपत्रक जाहीर केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कासलेला कोणत्याही प्रकारची निवडणूक ड्यूटी लावण्यात आली नव्हती. दरम्यान, हे आरोप निर्धार, बिनबुडाचे, दिशाभूल आणि निवडणूक प्रक्रियेवर अवास्तव शंका उपस्थित करण्याच्या दृष्टीने करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
दरम्यान, बीडमधील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण तापलेले असताना रणजित काललेचे निलंबन, त्याने केलेले दावे या सगळ्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.