भाजपने (भारतीय जनता पक्ष) महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यभर एकूण १२२१ मंडळं तयार करण्यात आली आहेत. यापैकी ९६३ मंडळाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली आहे.
हे मंडळ म्हणजे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील एकक आहेत. यामध्ये २५८ नवीन मंडळं तयार करण्यात आली आहेत. भाजपचं म्हणणं आहे की, या मंडळांद्वारे पक्ष सर्वसामान्य मतदारांशी थेट संपर्क साधणार आहे आणि गावखेड्यांपर्यंत पोहोचणार आहे.
प्रत्येक विभागात मंडळांची संख्या अशी आहे:
– कोकण-ठाणे : 184
– उत्तर महाराष्ट्र : 184
– पश्चिम महाराष्ट्र : 222
– विदर्भ : 313
– मराठवाडा : 207
– मुंबई : 111
भाजप महापालिका निवडणुकीसाठी सज्ज
१.स्थानिक नेतृत्वाला बळ
प्रत्येक मंडळात अध्यक्ष नियुक्त करून स्थानिक नेत्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.त्यामुळे निर्णय प्रक्रिया स्थानिक पातळीवरच घडू लागली आहे.
२.थेट जनसंपर्क मोहीम
भाजप सर्वसामान्य मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर देत आहे.गाव, प्रभाग, वार्ड पातळीवर संवाद यात्रा, मेळावे, बूथ मीटिंग्स यांचं आयोजन सुरू आहे.
भाजपने महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाची पकड वाढू शकते. ही रणनीती पक्षाच्या जनाधार वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरू शकते.तसेच शहरी आणि ग्रामीण मतदारांमध्ये बळकटी आणण्याच्या दृष्टीने देखील महत्त्वाची ठरू शकते. मात्र महापालिका निवडणुकीसाठीची भाजपची ही शिस्तबद्ध, आणि नियोजनबद्ध तयारी त्यांना आगामी निवडणुकीत फायद्याची ठरते का? ते पहाणे महत्वाचे ठरणार आहे.