CSK vs Mumbai:आयपीएल सुरू झाल्यापासून या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचा प्रभाव जास्त दिसून येत होता. मात्र यंदाच्या हंगामात हे दोन्ही संघ पिछाडीवर दिसत आहेत. अशा या दोन संघाचा सामना रविवारी(दि. २१ एप्रिल) रोजी पार पडला.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १७६ धावा करत १७७ धावांचे मुंबईसमोर आव्हान ठेवले होते. मात्र प्रतिउत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर मुंबईने चेन्नईला पराभवाची धूळ चारली. या विजयासह मुंबईने लागोपाठ तिसरा विजय नोंदवला आहे. या सामान्यात हिटमॅनरोहित शर्माने ४५ चेंडूत नाबाद ७६ धावांची खेळी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहित शर्मा लयीत आला आहे, अशा चर्चा रंगल्या आहेत.
अलीकडेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वानखेडे स्टेडियमवरील एका स्टँडला रोहितचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. रोहित शर्माने नुकतीच यावरती भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, एके काळी मला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. स्टेडियमच्या बाहेर उभे राहून आत डोकावण्याची देखील परवानगी देण्यात येत नव्हती. आज, जेव्हा मी त्याच मैदानावर खेळत आहे आणि तिथे माझ्या नावाचे एक स्टँड आहे. तेव्हा मला काय प्रतिक्रिया द्यावी हे नक्की समजत नाहीये. हा माझ्यासाठी एक मोठा सन्मान आहे”.