‘नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत आज सुरक्षा दलांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले. झारखंडमधील बोकारो येथील लुगू हिल्स येथे झालेल्या चकमकीत ८ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, ज्यात १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला एक उच्चस्तरीय नक्षलवादी नेता विवेक आणि इतर दोन कुख्यात नक्षलवादी यांचा समावेश आहे. ही कारवाई सुरूच आहे. आमच्या सुरक्षा दलांचे कौतुक करा, असे ट्विट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
"Our march to eliminate Naxalism continues unabated," says Amit Shah after 8 Naxals killed in Jharkhand
Read @ANI Story | https://t.co/X7kDEwccan#Jharkhand #Naxalism #AmitShah pic.twitter.com/sYJO7tv6JP
— ANI Digital (@ani_digital) April 21, 2025
सोमवारी झारखंडमधील सुरक्षा दलांना मोठे यश मिळाल्यानंतर अमित शहांनी हे ट्विट केले आह. सोमवारी सकाळी बोकारो जिल्ह्यातील लालपनिया येथील लुगु टेकडी भागात नाक्षवाद्यांसोबत झालेल्या चमकीत सुरक्षा दलाच्या पथकाने आठ नक्षलवाद्यांना ठार केले आहे, ज्यात कुख्यात नक्सली प्रयाग मांझी उर्फ विवेक याचा देखील समावेश आहे. सरकारने प्रयागर मांझीवर एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
दरम्यान, सुरक्षा अधिकाऱ्याने या कारवाईसंबंधीत माहिती देताना सांगितले की, ‘झारखंड पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा कमांडोच्या संयुक्त दलांना या भागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान, सोमवारी सकाळी साडेपाच वाजता लालपनिया पोलिस स्टेशन परिसरातील लुगु टेकडी भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली ज्यामध्ये आठ हाय प्रोफाईल नक्षलवादी ठार झाले आहेत.’