जम्मू-काश्मीरमधील पहलगाम एक शांत, निसर्गरम्य पर्यटनस्थळ पण मंगळवारी तिथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केल्याने इतके दिवस शांत असलेला हा भाग अचानक झालेल्या या भ्याड हल्याने अशांत झाला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्यात अनेक पर्यटक होते जे फक्त सुट्टी घालवायला आले होते.
ही बातमी समजताच,पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणताही वेळ न घालवता आपला अरेबियाच्या दौरा, अर्धवट सोडून भारतात परतण्याचा निर्णय घेतला ते आज सकाळी दिल्लीत दाखल झाले आणि विमानतळावर पोहोचताच तातडीने सुरक्षा यंत्रणांकडून अहवाल घेतला तसेच कॅबिनेट समितीची विशेष बैठक बोलावली.यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना हल्ल्याबाबत माहिती दिली.
यावेळी मोदी सौदी अरेबियात होते. तिथे पोहोचल्यावर लगेच त्यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यामुळे त्यांची सौदी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी नियोजित बैठक दोन तास उशिराने सुरू झाली. या बैठकीत मोदींनी क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी चर्चा केली तेंव्हा त्यांनीही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. हल्ल्यानंतर, मोदींनी आधिकारिक डिनर टाळलं आणि लगेच मायदेशी परतले. यासंदर्भात मोदींनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंट वर एक पोस्ट शेअर करत या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच या हल्यात ज्या नागरिकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
I strongly condemn the terror attack in Pahalgam, Jammu and Kashmir. Condolences to those who have lost their loved ones. I pray that the injured recover at the earliest. All possible assistance is being provided to those affected.
Those behind this heinous act will be brought…
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2025
पहलगाम हल्ल्यानंतर तातडीची कारवाई; अमित शाह थेट श्रीनगरला रवाना
पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश सुन्न झाला असताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कोणतीही वेळ न दवडता कालच श्रीनगर गाठलं. त्यांनी तिथं उच्चस्तरीय सुरक्षा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, तसेच उपराज्यपाल मनोज सिन्हा यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी मिळून सुरक्षेची रणनीती ठरवली आहे. दरम्यान या भ्याड हल्ल्यामागे असलेल्या एकालाही सोडणार नाही,दोषींना शिक्षा होईपर्यंत सरकार शांत बसणार नाही असा इशारा भारत सरकारकडून देण्यात आला आहे.
वस्तुतः 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये झालेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. हा दहशतवादी हल्ला अत्यंत दुःखद आणि संतापजनक असून इतक्या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जेव्हा निष्पाप पर्यटकांवर असा भ्याड हल्ला होतो, तेव्हा तो फक्त एक भाग नव्हे तर संपूर्ण देश हलतो.अशा वेळी फक्त सहवेदना व्यक्त करणं पुरेसं नसतं, तर कृती महत्त्वाची असते आणि ती कृती इथे दिसते आहे.