Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मिरमध्ये पहलगामच्या बैसर भागात काळजाला सुन्न करणारी घटना घडली आहे.२२ एप्रिलला पहलगाममधील बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले, ज्यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषत: या हल्ल्यात धर्म विचारून पुरूषांना टार्गेट करण्यात आल्याची माहिती समोरल आली आहे. दहशतवादी हे पोलिस युनिफॉर्ममध्ये आले होते या हल्ल्यामागे टीआरएफ दहशवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात यापूर्वीही मोठे दहशतवादी हल्ले झाले होते.
-१४ फेब्रुवारी २०१९ रोजी, पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका आत्मघाती हल्लेखोराने सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.
-१८ सप्टेंबर २०१६ रोजी, दहशतवाद्यांनी उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले.
-२ जानेवारी २०१६ रोजी, दहशतवाद्यांनी पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले.
-२६ नोव्हेंबर २००८ रोजी, लष्कर-ए-तैयबाच्या १० दहशतवाद्यांनी मुंबईत हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले आणि ३०० हून अधिक जखमी झाले.
-१३ डिसेंबर २००१ रोजी, दहशतवाद्यांनी नवी दिल्लीतील भारतीय संसदेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दहशतवादी मारले गेले होते, परंतु काही सुरक्षा कर्मचारीदेखील शहीद झाले होते.
-२० मार्च २००० रोजी, दहशतवाद्यांनी काश्मीरमधील छित्तीसिंगपुरा गावात ३६ शीख ग्रामस्थांची हत्या केली होती.
-२००० मध्ये झालेल्या छित्तीसिंगपुरा हत्याकांडात दहशतवाद्यांनी ३६ शीख ग्रामस्थांची हत्या केली.
-२००५ साली दहशतवाद्यांनी अयोध्येतील वादग्रस्त स्थळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.
-डिसेंबर २०२२ झालेल्या राजौरी हल्यात अनेकजण मारले गेले होते दहशतवाद्यांनी नागरिकांवर हल्ला केला होता.
-ऑगस्ट २०२३ मध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यात ५ जवान शहीद झाले.
दरम्यान, भारतात १९८९ पासून आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले झाले, ज्यात सुरक्षा जवान आणि सामान्य नागरिक मारले गेले. यात सीमापार दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांचा समावेश आहे.ईशान्येकडील राज्यांमध्ये अनेक वर्षांपासून विविध फुटीरतावादी गट सक्रिय आहेत, त्यामुळे दहशतवादी गटाला हल्ले करण्यास मदत होते.
विशेष म्हणजेच जेव्हा अमेरीकेते राष्ट्रध्यक्ष भारत दौऱ्यावर असताना भारतावर झालेले हल्ले:
– २२ एप्रिल २०२५ रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांचा भारत दौरा सुरू असताना काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होता. या हल्लात २८ हिंदू पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
२०२० मध्ये २४ ते २५ फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा असताना दिल्लीत मोठी दंगल झाली होती या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता.
-२०१५ मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीदरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या कट रचल्याप्रकरणी बेंगळुरूमधील विशेष एनआयए न्यायालयाने तीन संशयित दहशतवाद्यांना दोषी ठरवले होते.