Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगामचा भाग भारताचे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखला जातो. याच भागात फिरायला आलेल्या पर्यटकांवर २२ एप्रिलला मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. या हल्ल्यातील एक विदारक चित्र समोर आले आहे ते म्हणजे एक नवविवाहित जोडपे फिरायला आलेले असता या दहशतवादी हल्ल्यात त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला, त्यानंतरी ती महिला आपल्या पतीच्या मृतदेहाच्या बाजूला खिन्न मनाने बसलेली दिसत आहे. हा फोटो पाहून प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आपल्या पतीचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्यानंतर पत्नीने जिवाच्या आकांताने दहशतवाद्यांना विनंती केली होती की, “आता मलाही मारा.” त्यावर दहशतवाद्यांनी उत्तर दिले की, “आम्ही तुला जिवंत सोडत आहोत, जेणेकरून तू तुझ्या सरकारला आमचे काय केले ते सांगशील.” , हा संवाद माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. हा संवाद वाचून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
या नवविवाहित जोडप्याचे लग्न आठवड्यापूर्वीच झाले होते. त्याचे मूळ गाव दिल्लीतील हाथीपूर येथे आहे. त्याच्या कुटुंबियांनी सरकारकडे मृतदेह लवकर पाठवण्याची मागणी केली आहे. तसेच या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी मागणीही केली.
दरम्यान, या हल्ल्यात महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांतील पर्यटक मारले गेले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडत भारत गाठला आहे.