उन्हळ्याच्या सुट्ट्यांच्या आनंद घेण्यासाठी एक कुटुंब जम्मू-काश्मीरला फिरायला जात. आणि तिथे त्यांच्यासोबत अशी एक घटना घडते की संपूर्ण आयुष्य उध्वस्त होत. या कुटुंबाला घरातून निघताना याचा अंदाजही आला नसेल की आपल्या सोबत असे काही घडू शकते. या घटनेने संपूर्ण देशाचे मन भरून आले आहे. जम्मू-काश्मीर मधील पहलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ही घटना घडली आहे. नेमके काय घडलं?
मंगळवारी जम्मू-काश्मीर मधील पहलगाम बैसरन येथे मोठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी याठिकाणी आलेल्या पर्यटकांना लक्ष करत गोळ्या झाडल्या. ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये मंजुनाथ यांचे कुटुंब देखील उध्वस्त झाले. मंजुनाथ हे कर्नाटकचे रहिवासी होते जे एक व्यवसायिक होते. ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीर फिरण्यासाठी गेले होते. ते त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलासोबत गेले होते. पहलगाम बैसरन येथे जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा या हल्ल्यात मंजुनाथ यांचा देखील मृत्यू झाला.
मंजुनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पल्लवी यांना जेव्हा या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी जे सांगितले ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. पल्लवी यांना जेव्हा या घटनेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. पल्लवी म्हणल्या, आम्ही जेव्हा त्या ठिकाणी फिरत होतो तेव्हा तिथे पोलिसांच्या गणवेशातील काही लोक आले आणि आम्हाला तुमचा धर्म कोणता असे विचारले. त्यानंतर त्यांनी माझ्या नवऱ्यावर (मंजुनाथ) गोळ्या झाडल्या. आम्ही त्यांना विनवण्या केल्या तरी त्यांनी आम्हाला सोडलं नाही. मी त्यांच्यकडे मला आणि माझ्या मुलाला पण मारा असं म्हणत होते तेव्हा त्यांनी हे मोदींना जाऊन सांगा असं म्हणत आम्हाला सोडून दिले. पल्लवी यांनी एका क्षणात त्यांचे घर उध्वस्त होताना पाहिले. पल्लवी यांची ही कहाणी ऐकून घडलेली घटना किती भयान असू शकते याचा अंदाज येतो.
दरम्यानपल्लवी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मंजुनाथ आणि पल्लवी यांचा सोबतचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ श्रीनगरमधील दाल सरोवराचा आहे. यामध्ये, कर्नाटकातील व्यापारी मंजुनाथ, त्यांच्या पत्नीसह उपस्थित, काश्मीरच्या त्यांच्या भेटीबद्दल सांगत आहेत. मंजुनाथने हा व्हिडिओ प्रवासाचा अनुभव म्हणून बनवला होता. यामध्ये मंजुनाथ, या सहलीचा अनुभव सांगत आहेत. तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://x.com/gharkekalesh/status/1914698057733825004
दरम्यान, दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात फक्त पल्लवी यांचे कुटुंब नाही तर अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत.