Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. आता सुरक्षा दल हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. त्यातच आता या हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्याचे नाव समोर आले आहे.
पहलगामच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड हा सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्लाह कसुरी हा असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कारवाईचे नियंत्रण हाच सैफुल्लाह खालिद करत असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे.
कोण आहे सैफुल्लाह कसुरी ?
-सैफुल्लाह कसुरी हा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या संघटनेचा म्होरक्या आणि हाफिज सईद याचा निकटचा सहकारी मानला जातो. हाफिज सईद पाकिस्तानातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आहे.
– सैफुल्लाह कसुरी हा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’श(TRF) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे आणि लष्कर-ए-तैयबा या संघटनेची एक शाखा मानली जाते.
– खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख असल्याची माहिती आहे.
-2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सैफुल्लाह लष्कर-ए-तैयबामध्ये सामील झाला होता.
-किस्तानातील मुरीदके येथील एलईटी कॅम्पमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले.
– सैफुल्लाह कसुरी हा ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे आणि लष्कर-ए-तैयबा या संघटनेची एक शाखा मानली जाते.
-सैफुल्ला खालिदने यापूर्वीही भारतात अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली आहे.
-तो पाकिस्तानमधील पेशावर येथे असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयात कार्यरत असतो, असे अहवालांमध्ये नमूद आहे.
-पाकिस्तानातील मुरीदके येथील एलईटी कॅम्पमध्ये त्याने प्रशिक्षण घेतले आहे.
सैफुल्लाह खालिद हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जात आहे. या हल्ल्यासाठी पाच ते सहा पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्याने पाठवले होते. भारताने 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर त्याने नाराजी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्याने या हल्ल्याची योजना आखली होती, असे म्हटले जात आहे.