IPL: काल जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. काळीज सुन्न करणाऱ्या या घटनेचा निषेध आज आयपीएलच्या सामन्यातही नोंदवण्यात येणार आहे.
आज मुंबई इंडियन्स विरूद्ध सनराझर्स हैदराबादचा सामना आहे. या सामान्यादरम्यान, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सचे खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून या घटनेचा निषेध नोंदवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेत बाधित झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघ एक मिनिटाचे मौन देखील पाळणार आहेत.
निषेध म्हणून आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद यांच्या सामन्यात कोणत्याही प्रकारचे चीअरलीडर्स नसणार आहेत. तसेच फटाके देखील फोडले जाणार नाहीत, अशी माहिती देखील समोर आली आहे.
दरम्यान, विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी या हल्ल्याबाबत शोक व्यक्त केला आहे. 2008 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडले होते. याचाच भाग म्हणून नुकतेच भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता.