Pahalgam Terrorist Attck:पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. मात्र दौरा अपूर्ण सोडून पंतप्रधान तातडीने देशात परतले होते. त्यामुळे या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारत कारवाई करेल, असा अंदाज बांधण्यात येत होता. त्यातच आता या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
१) १९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येईल, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला विश्वासार्ह आणि अपरिवर्तनीयपणे पाठिंबा देत नाही.
२) अटारी बाॅर्डर बंद करण्यात आली आहे. वैध मान्यतांसह जे भारतीय नागरिक पाकिस्तानात गेले आहेत, ते १ मे २०२५ पूर्वी परत येऊ शकतात.
३) पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. पाकिस्तानी नागरिकांना भूतकाळात जारी केलेले कोणतेही SPES व्हिसा रद्द मानले जातील. SPES व्हिसा अंतर्गत सध्या भारतात असलेल्या कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारत सोडण्यासाठी ४८ तासांचा कालावधी आहे.
४) नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्कर, नौदल आणि हवाई सल्लागारांना पर्सना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आहे. त्यांना भारत सोडावा लागणार आहे, त्यासाठी त्यांना एक आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
५) भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागार मागे घेणार आहे. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातील.