Pahalgam Terrorist Attack: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल भारत सरकारकडून पाकिस्तानविरोधात पाच महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. २३ मार्च रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.
आजही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. या सर्वपक्षीय बैठकीत हल्ल्याविषयी चर्चा केली जाणार आहे. सरकारकडून गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत ब्रीफ करणार आहेत. काॅंग्रेसह इतर काही पक्षांनी या हल्ल्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीच मागणी केली होती. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे
या सर्वपक्षीय बैठकीत हल्ल्याचा बदला घेण्यासाठी योजना आखली जाऊ शकते, अशा चर्चा रगंत आहेत. त्यामुळे ही सर्वपक्षीय बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या हल्ल्यानंतर या हल्ल्याचा बदला घेतला जावा, अशी भावना आता अनेकजण व्यक्त करत आहेत.
दरम्यान,२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. याच हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार अॅक्शन मोडवरती आल्याचे दिसत आहे.