जम्मू काश्मिरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद
Pahalgam Terrorist Attack:पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना टार्गेट केल्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यातल आणखी एक हृदद्रावक घटना समोर आली आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरू केली आहे. दहशतवादी हल्ल्याचे सर्च ऑपरेशन सुरू असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. या चकमकीत १ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर काही जवान जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
तर भारतीय लष्कराने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आला आहे. या मोहिमेत अनेक पोलिसांचाही सहभाग आहे. सध्या काश्मीर खोऱ्यात १०० पेक्षा अधिक दहशतवादी असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू असून भारतीय सैन्य आणि दहशतवादी यांच्यात चकमक होत आहे.
दरम्यान, आता भारत सरकार दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी मोठी योजना आखत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मोदी सरकारने प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान विरोधात पाच मोठे निर्णय घेतले आहेत. आजही सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहेत. त्यामुळे या हल्ल्याचा बदला सरकार घेईल, हे तर निश्चितच.