मुंबईतील भाजप नेते किरीट सोमय्या यांना अनधिकृत मशिदी आणि बेकायदेशीर लाऊडस्पीकर (भोंगे) विरोधात कारवाईची मागणी केल्याबद्दल धमकी देणाऱ्या युसूफ उमर अन्सारी या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सोमय्या यांनी ‘X’ (पूर्वीचा ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल माहिती दिली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अलीकडेच मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृत मशिदी आणि त्यावर लावण्यात आलेले बेकायदेशीर लाऊडस्पीकर (भोंगे) याबाबत तक्रार केली होती. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की: “जे धार्मिक स्थळं बेकायदेशीररित्या उभारण्यात आलेली आहेत, किंवा ज्याठिकाणी लाऊडस्पीकर नियम तोडून वापरले जात आहेत, त्यावर कारवाई व्हावी.” ही मागणी त्यांनी मीडियामधून आणि सोशल मीडियावरून उघडपणे केली होती.
सोमय्या यांची ही मागणी काही लोकांना धार्मिक दृष्टिकोनातून आक्षेपार्ह वाटली. त्यामुळे युसूफ अन्सारी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला.त्या व्हिडीओमध्ये अन्सारीने थेट धमकी दिली की, “मी तुला तुझ्या घरात घुसून मारीन!” त्याच्या या धमकीने स्थिती तणावपूर्ण बनली.
यासंदर्भात बोलताना सोमय्या म्हणाले की मी फक्त कायद्याचे पालन व्हावे म्हणून मागणी केली होती, कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हतो. पण या धमकीनंतर सोमय्या यांनी ईशान्य मुंबईचे भाजप अध्यक्ष दीपक दळवी यांच्याकडे तक्रार केली. दळवी यांनी मुलुंड पोलिस आयुक्तांना पत्र लिहून अन्सारीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अनधिकृत मशिदी आणि बेकायदेशीर भोंगे लाऊडस्पीकर विरुद्ध कारवाईची मागणी केल्याबद्दल मला धमकी देणाऱ्या युसूफ अन्सारीला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे.
Police arrested Yusuf Ansari, who threatened Me for demanding action against illegal Masjids &… pic.twitter.com/OQul6iNGMQ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 24, 2025
त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देणे हा गंभीर गुन्हा मानून मुलुंड पोलिसांनी अन्सारीला ताब्यात घेतले आहे. खरतर सोमय्या यांना मिळालेल्या धमक्यांबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता अन्सारीची अटक ही सोमय्या यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरली आहे,