Pahalgam Terrorist Attck News: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. तसेच बदला घेण्याचा इशारा देखील दिला आहे.
परंतु आता सैफुल्ला कसुरीनेच एक व्हिडिओ जारी करत भारतावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने व्हिडिओमध्ये म्हटले की, “हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. ही भारतानेच रचलेली कटकारस्थान आहेत. भारतच युद्धाला कारणीभूत आहे.” सैफुल्लाह कसुरीचा हा व्हिडीओ पाहून अनेक भारतीय तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
Lashkar-e-Taiba (LeT) deputy chief Saifullah Kasuri says these men arent theirs..
Denies role in #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/kb3hZzHAHW
— Nabila Jamal (@nabilajamal_) April 24, 2025
भारतीय माध्यमे आणि सरकार खोटे आरोप करत आहेत. भारतानेच काश्मीरमध्ये १० लाख सैन्य पाठवून युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. भारत पाकिस्तानला संपवू इच्छितो.” असे म्हणत त्याने भारतीय भूमिकेवर रोष व्यक्त केला आहे आणि हल्ल्याचा निषेध देखील केला आहे. सैफुल्ला कसुरीने पुढे सिंधू पाणी करारावरही भाष्य केलेले आहे. भारत पाकिस्तानचे पाणी थांबवण्याच्या तयारीत आहे. शांतता संपवून पाकिस्तानला कमजोर करण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, कसुरीने आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून देखील भाष्य केलेले दिसत आहे. त्याने म्हटले आहे की, “भारताला डोळे बंद करून पाठिंबा देण्याऐवजी सत्याकडे पाहावे. पहलगाम हल्ला भारतानेच घडवून आणला असून पाकिस्तानचा या हल्ल्यात कोणताही सहभाग नाही.” त्याने भारतावर केलेल्या आरोपामुळे हे स्पष्ट जाणवते की, तो पाकिस्तानला हल्ल्याच्या आरोपासून वाचवू पाहत आहे आणि स्वत:चाही बचाव करत आहे.