जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. तसेच जगभरातून दुःखद प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान मात्र, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायोगामध्ये एक वेगळाच हर्षोल्हास पाहायला मिळाला. पाकिस्तान दूतावासातील एक उच्च अधिकारी हातात केकचे पार्सल घेऊन जाताना दिसला.
या अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एकीकडे जगभरातून या कृतीची निंदा होत असताना तसेच हल्ल्याच्या जखमा ताज्या असताना पाकिस्तान दूतावासात कशाचे सेलिब्रेशन होत आहे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक घेऊन जाताना पाकिस्तानी अधिकाऱ्याला प्रसारमाध्यमांनी पाहिले व त्याला घेराव घातला. त्याच्या हातात केकचा बॉक्स होता. त्याला माध्यमांच्या प्रतिनिधींनी हा केक कशासाठी नेला जात आहे, २६ लोक मारले गेलेत त्याचे काही वाईट वाटतेय का, तसेच कशाचे सेलिब्रेशन पाकिस्तान दूतावासात केले जाणार आहे, असे अनेक प्रश्न विचारले मात्र, या पाकिस्तानी अधिकाऱ्याने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. आणि तो तिथून वाट काढत निघून गेला.
https://x.com/MrSinha_/status/1915276287691682187
पाकिस्तानी अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ व्हायरल होताच लोक प्रचंड चिडले असून, काही लोक याला पहलगाम हल्ल्याशी देखील जोडत आहेत. जेव्हा देशात अशी वेदनादायक घटना घडली आहे, तेव्हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात कशाचा आनंद साजरा केला जात आहे, यामुळे पाकिस्तानचे कट उघड होत आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकराने पाकिस्तानविरोधात महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.