जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांची नावे आणि त्यांच्या रेखाचित्रांची माहिती जाहीर केली आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.
हल्ल्यात सामील असलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एकाचे नाव आसिफ फौजी उर्फ आसिफ शेख असून त्याचे घर दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे आहे. हे घर आता उद्ध्वस्त झाले असून, त्यामध्ये स्फोटक वस्तू आढळल्यामुळे मोठा स्फोट झाला आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
VIDEO | House of terrorist Asif Sheikh, who was allegedly involved in Pahalgam terror attack, was blown up in Jammu and Kashmir's Tral. More details awaited.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/KQLGoPRpgf
— Press Trust of India (@PTI_News) April 25, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसिफ शेख, सुलेमान शाह आणि अबू तल्हा हे तिघे दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. त्यांची रेखाचित्रे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहेत. त्यांना मूसा, युनूस आणि आसिफ अशी कोड नावे होती.
या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची ‘रेझिस्टन्स फ्रंट’ शाखा यांनी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणजे सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद, जो पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबासाठी काम करतो.
सध्या संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत निर्णायक ठरणार आहे, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.