दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी खटल्यात दोषी आढळलेल्या मेधा पाटकर यांना साकेत न्यायालयाच्या आदेशानंतर दिल्ली पोलिसांनी आज अटक केली आहे. थोड्याच वेळात दिल्ली पोलिस नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना साकेत कोर्टात हजर करतील.
२३ एप्रिल रोजी न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट सादर केले होते. मागील न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल हे अजामीनपात्र वॉरंट सादर करण्यात आले होते.
न्यायालयाने पाटेकर यांना विशिष्ट अटींवर सोडले होते. त्यांना १ लाख रुपये जमा करण्याच्या अटीवर सोडण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांना एका वर्षासाठी विशिष्ट अटीवर सोडले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी असेही सांगितले होते की, पाटकर, त्यांच्यावर लावण्यात आलेला १० लाख रुपयांचा दंड भरणार नाही, पण दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना १ लाख रुपये भरपाई द्यावी लागेल.’
https://x.com/ani_digital/status/1915649393941746055
प्रकरण काय आहे?
दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २००१ साली मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. विनय कुमार त्यावेळी अहमदाबाद इथल्या एनजीए नॅशनल कौन्सिल फॉर सिविल लिबर्टीजचे प्रमुख होते. मेधा पाटकर यांनी २५ नोव्हेंबर २००० साली एक पत्रक जारी करत विनय कुमार हे पळपुटे आणि देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणी मेधा पाटकर यांना कोर्टाने दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली होती.