स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्या अटकेला स्थगिती दिली आहे. शुक्रवारी, न्यायालयाने यावर सुनावणी दिली आहे. कुणालने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याच प्रकरणात त्याला अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या एक शो मध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले होते. यावेळी त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते व या प्रकरणात कुणाल कामराला अटक करण्याची मागणी केली जात होती. त्याच्याविरूद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती.
ही एफआयआर रद्द करण्यासाठी व अटक टाळण्यासाठी कुणालने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून कामराला दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याच्या अटकेला स्थगित दिली आहे.
कुणालच्या याचिकेवर सुनावणी करताना, न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एसएम मोडक यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘खार पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यात कुणाल कामरा अटक केली जाणार नाही. पण या प्रकरणाचा तपस सुरु राहील. असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. कुणाल हा तामिळनाडूचा रहिवासी असल्याने, जर पोलिसांना कुणालची चौकशी करायची असेल तर ती चेन्नईमध्ये करावी, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.