IPL:सध्या आयपीएलचा महासंग्रा पूर्ण रंगात आहे. आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रत्येक संघाला प्रत्येकी 14 सामने खेळावे लागतात. त्यानंतर दहा संघापैकी केवळ वरचे चार संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरतात. सध्या प्रत्येकी संघाचे सात पेक्षा जास्त सामने झालेले आहेत. त्यामध्ये काही संघांनी खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर काही संघांची कामगिरी अगदीच निराशाजनक आहे. त्यातच आता संघांचे थोडेच सामने बाकी असल्यामुळे ही लढत अजूनच तीव्र झाली आहे.
सध्याची स्थिती पाहता शुभमन गिल(Shubhaman Gill) याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स आणि अक्षर पटेल याच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ अतिशय उत्कृष्टपणे खेळताना दिसून येत आहेत. जे अनुक्रमे 12 व 10 गुण मिळवुन पॉइंट्स टेबल च्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत. साई सुदर्शन व प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या खेळाडूंमुळे गुजरातचा तर के एल राहुल व कुलदीप यादव या खेळाडूंमुळे दिल्लीचा विजयरथ अखंडित चालू आहे.
असे असले तरी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(RCB) व किंग्स इलेव्हन पंजाब हे संघ देखील खूपच मजबूत स्थितीत असताना पाहायला मिळत आहेत. विराट कोहली(Virat Kohali) व फिल सॉल्ट यांसारखे मातब्बर फलंदाज तर भुवनेश्वर कुमार व जॉश हेझलवूड यांसारखे अष्टपैलू गोलंदाज यामुळे बेंगलोर चा संघ खूपच मजबूत भासतो. त्याचप्रमाणे श्रेयश अय्यरच्या (Shreyas Iyer)नेतृत्वाखालील पंजाबच्या संघानेही आपल्या विजयाची मालिका कायम राखली आहे. याही संघांनी प्रत्येकी दहा गुण मिळवून आपले स्थान मजबूत केले आहे. या चार संघांचे प्रभुत्व कायम असतानाही ऋषभ पंत ची लखनऊ सुपर जायंट्स व हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स(Mumbai Indiance) हे संघ देखील या शर्यतीत अजून समाविष्ट आहेत.
गेल्यावर्षीचा विजयी असणारा संघ कोलकाता नाईट रायडर्स व उपविजेता असणारा संघ सनरायझर्स हैदराबाद(SRH) यांना मात्र यावर्षी म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. त्याच बरोबर या दोन संघांसोबत चेन्नई सुपर किंग्स व राजस्थान रॉयल्स या दोन संघांनाही खूप मोठ्या अपयशाचा सामना यावर्षी करावा लागला आहे. अशाप्रकारे या चार संघांचे या प्रतियोगितेतील जिंकण्याचे स्वप्न संपण्याच्या मार्गावर आहे.
वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास सर्वाधिक धावा मिळवणाऱ्या खेळाडूसाठी असणारी ऑरेंज कॅप सध्या गुजरात टायटन्स चा फलंदाज साई सुदर्शन या खेळाडू कडे आहे. साई सुदर्शन ने आठ सामन्यात 417 धावा मिळवण्यात यश मिळवले आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूसाठी असणारी पर्पल कॅप गुजरात टायटन्स चाच गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याने राखली आहे. प्रसिद्ध कृष्णाने आठ सामन्यात 18 बळी घेण्यात यश मिळवले आहे.
आत्तापर्यंत झालेले सामने पाहता गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हे संघ खूपच मजबूत दिसतात. रॉयल चॅलेंजेस बँगलोर संघाची फलंदाजांची फळी खूपच मजबूत दिसते. संघाचा अष्टपैलू खेळाडू विराट कोहली याने आतापर्यंत आठ सामन्यांमध्ये 322 धावा मिळवल्या आहेत. तर त्याच संघाचा घातक गोलंदाज जॉश हेझलवुड याने बारा बळी मिळवले आहेत. धावांचा पाठलाग यशस्वीपणे करण्यासाठी हा संघ ओळखला जातो. गुजरात टायटन्स बद्दल बोलायचे झाल्यास ऑरेंज कॅप व पर्पल कॅप मिळवणारे दोन्ही खेळाडू याच संघामध्ये आहेत. तर संघाचा कर्णधार शुभमन गिल याचा हा सीजन खूपच उत्कृष्ट जाताना दिसत आहे. त्यामुळे या दोन संघांपैकी कोणतातरी एक संघ विजयाची ट्रॉफी जिंकेल अशी शक्यता आहे.
असे असले तरी अजून संघांचे बरेच सामने बाकी असल्याने खूप अनिश्चितता आहे. त्यामूळे एवढ्या अगोदर कोणत्याही संघाच्या विजयाची खात्री देता येत नाही.