CSK: 25 फेब्रुवारी रोजी चेन्नई विरुद्ध हैदराबाद सामाना झाला. या सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून हैदराबाद संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १५४ धावा केल्या. त्यामुळे हैदराबादसमोर १५५ धावांचे आव्हान होते. मात्र हे आव्हान हैदराबादने केवळ १९ षटकात पूर्ण केले.
१५५ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या हैदराबाद संघाची सुरुवात काहीशी चांगली झाली नव्हती. कारण अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला होता. परंतु इशान किशनने कालच्या सामन्यात संघाला मोठा आधार दिल्याचे दिसून आले. कारण इशान किशनने एकाकी झुंज सुरु ठेवत 34 चेंडूत 44 धावा केल्या.
हैदराबादचा काल विजय झाल्याने हैदराबादच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. कारण हैदराबादचे आता पाच सामने उरले आहेत, जर पाच पैकी पाच सामान्यात हैदराबाद संघ विजय मिळवण्यात यशस्वी ठरला तर हैदराबाद प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतो. हैदराबादचे आतापर्यंत ९ सामने झाले आहेत. त्यापैकी केवळ ३ सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला आहे तर ६ सामन्यात हैदराबादचा पराजय झाला आहे.
दरम्यान, आता चेन्नई सुपर किंग्जचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्न जवळपास पूर्णपणे भंगले आहे. कारण चेन्नईने आतापर्यंत केवळ २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ७ सामन्यात चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता चेन्नईचे पाच सामने बाकी आहेत. त्यामुळे चेन्नईने उर्वरित पाच सामन्यात जरी विजय मिळवला तरी चेन्नई प्ले ऑफमध्ये जाईल, अशी शक्यता वाटत नाही.