‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच संघर्षपूण तणाव राहिला आहे. दोन्ही देश या ना त्या मार्गाने आपापसातील प्रश्न सोडवतील. माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश जवळचे आहेत. हजारो वर्षांपासून ते एकमेकांशी भांडत आहेत. काश्मीरचा प्रश्न हजारो किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून प्रलंबित आहे. पण पहलगामवर झालेला हल्ला वाईट होता. अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर दिली आहे. ट्रम्प यांचा हा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने शेअर केला आहे.
ट्रम्प यांनी रोमच्या दौऱ्यावर जात असताना ही प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प रोमच्या दौऱ्यावर जात असताना एअर फोर्स वनच्या विमानात एका पत्रकाराने पहलगाम हल्ल्यावर प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील तणावावर भाष्य केले आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरुद्ध मोठी पाऊले उचण्यात आली आहेत. पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कारवाईत भारताने पाकिस्तानचे पाणी थांबवले आहे. भारताने सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला आहे. तसेच पाकिस्तान सोबतचे व्यापार संबंध देखील थांबवले आहेत.
#WATCH | On #PahalgamTerroristAttack, US President Donald Trump says, "I am very close to India and I'm very close to Pakistan, and they've had that fight for a thousand years in Kashmir. Kashmir has been going on for a thousand years, probably longer than that. That was a bad… pic.twitter.com/R4Bc25Ar6h
— ANI (@ANI) April 25, 2025
दुसरीकडे भारताकडून दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरू असून, सुरक्षा दलाकडून जम्मू काश्मिर खोऱ्यात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.