वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह! ‘१४ जानेवारी २०२५ रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी पहिले शाही स्नान, २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्याच्या दिवशी होणारे दुसरे शाही स्नान व ३ फेब्रुवारी २०२५ वसंत पंचमी दिवशी होणारे तिसरे शाही स्नान धोक्यात आहे.’ असे म्हणणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा भारतावर आपली वाईट नजर टाकली आहे.
काही दिवसांपूर्वीच मुहाकुंभात दहशत पसरवण्याची भाषा करणारा गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एका भारताबाबत असेच काहीसे वक्तव्य करत पाकिस्तानशी हात मिळवली केली आहे. पाकिस्तानच्या समोर आम्ही भिंतीसारखे उभे आहोत…कोणीही यावे…नरेंद्र मोदी किंवा मग अमित शहा…असं म्हणत त्याने भारताला ललकारले आहे. आता त्याच्या या वक्तव्यामुळे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचाही हात असू शकतो अशी शंका बळावली आहे. नेमकं काय म्हणाला पन्नू? पाहूया…
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या पहलगाममध्ये काही दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या क्रूर घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. भारतीय नागरिक या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या पर्यटकांसाठी न्यायाची मागणी करत आहेत. या घटनेची आंतराष्ट्रीय स्थरावरून देखील निंदा केली जात आहे. पण दुसरीकडे मात्र, पाकिस्तान या हल्ल्याचा बचाव करताना दिसत आहे. या हल्ल्याचा निषेध करण्याऐवजी पाकिस्तान उलट भारतालाच धमक्या देत आहे.
❗️🇺🇸US-based pro-Khalistani group leader vows to SUPPORT relatives of killed terrorists in 🇮🇳India pic.twitter.com/nJBvYsvEJG
— Sputnik India (@Sputnik_India) December 24, 2024
खरं तर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. ही टीआरएफ संघटना लष्कर-ए-तैयबा (LeT) या पाकिस्तानस्थित जिहादी दहशतवादी गटाची एक शाखा मानली जाते. आणि याच आधारे पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचे स्पष्ट झाले. पण पाकिस्तान मात्र, या हल्ल्याशी आमचा काही संबंध नाही असं म्हणत हात वरती करताना दिसत आहे. आणि भारताने या हल्ल्यामुळे आमच्यावर काही कारवाई केली तर आम्ही देखील त्याला प्रत्युत्तर देऊ अशी भूमिका घेतली.
पण हे असे झाले ‘चोराच्या उलट्या बोंबा…’ पाकिस्तान नेहमी असाच करत आले आहे. एकीकडे पाकिस्तान लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांना पोसत आहे तर दुसरीकडे आमचा या दहशतवादाशी संबंध नाही म्हणत हात वर करत आहे.
या सगळ्यात खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी घोषणाच एक प्रकारे त्याने केली आहे. पन्नूने नुकतेच वक्तव्य केले आहे की, भारतीय सैन्याला पाकिस्तानवर हल्ला करू देणार नाही, भारताकडे पाकिस्तानशी लढण्याची हिंमत नाही, आम्ही दोन कोटी शीख, पाकिस्तानसोबत एक भिंत बनून उभे आहोत. भारतात शीख आणि इतर अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहे. आता काळ बदलला आहे, आता २०२५ आहे, १९६५ किंवा १९७१ नाही. पाकिस्तानचे नावच पवित्रतेचे प्रतीक आहे आणि ते कधीही हल्ला करत नाहीत ही त्यांची परंपरा आहे. जो कोणी पाकिस्तानवर हल्ला करतो त्याचा शेवट वाईटच होतो…मग ते इंदिरा गांधी असो, नरेंद्र मोदी असो किंवा अमित शहा असो.’ असे वक्तव्य त्याने केले आहे.
आता त्याच्या या वक्तव्यानंतर तो देखील या हल्ल्यात सामील असू शकतो याला अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाकुंभात अर्थवट राहिलेले त्याचे मनसुबे त्याने या हल्ल्याद्वारे पूर्ण करून घेतले आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोण आहे दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू हा अमेरिकन आणि कॅनेडियन राजकीय कार्यकर्ता तसेच पेशाने तो वकील असल्याचे सांगितले जाते. तो खलिस्तान चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. शीख फॉर जस्टिस (SFJ) चा कायदेशीर सल्लागार व प्रवक्ता देखील आहे. शीख फॉर जस्टिस ही एक संघटना खलिस्तानला स्वतंत्र शीख राज्य म्हणून स्थापन करण्यास प्रोत्साहन देते. पन्नून याने २००७ मध्ये अमेरिकेत (यूएस) शीख फॉर जस्टिस (एसएफजे) ची स्थापना केली होती.
२०१८ मध्येने पन्नूने लंडनमध्ये एक व्यक्तव्य केले होते. ज्यानंतर तो सर्वात जास्त चर्चेत आला. “सध्या भारताच्या ताब्यात असलेल्या पंजाबला मुक्त करण्यासाठी २०२० मध्ये जनमत संग्रह” आयोजित करणार असल्याची घोषणा त्याने केली होती. यामुळे तो बातम्यांमध्ये चांगलाच चर्चेत राहिला होता. त्यानंतर पुढच्याच वर्षी, भारत सरकारने पन्नूनच्या शीख फॉर जस्टिस संघटनेवर बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत बंदी घातली आहे. शीखांसाठी तथाकथित जनमत चाचणीच्या नावाखाली, शीख फॉर जस्टिस पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवादी प्रोत्साहन देत आहे. आणि हे सर्व परदेशात सुरक्षित ठिकाणी बसून भारतात अशांतता पसरवत आहे. म्हणून पन्नूनला इतर आठ जणांसह यूएपीए अंतर्गत भारत सरकराने दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले.