जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करत ७ एप्रिल रोजी पाकव्याप्त काश्मीर मधील ९ दहशतवादी ठिकाणांना लक्ष करत उध्वस्त केले. ही कारवाई भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल अशा तीन दलांनी मिळून संयुक्तपणे केली. भारताने केलेल्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले असल्याच्या भावना देशवासियांकडून व्यक्त केल्या जात आहेत. आजच्या या लेखात आपण ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कोणत्या ठिकाणांवर कारवाई करण्यात आली व या ठिकाणांची निवड का करण्यात आली याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कुठे कारवाई झाली? आणि हीच ठिकाणं का निवडण्यात आली?
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाच पाकव्याप्त काश्मीर आणि चार पाकिस्तानमधील चार सक्रिय दहशतवादी स्थळांना लक्ष करण्यात आले.
मरकज सुभानअल्ला, बहावलपूर (जैशे महंमदचे मुख्यालय) :
आंतराष्ट्रीय सीमेपासून जवळपास हे अंतर १०० किमी लांब आहे. हे ठिकाणी जैश ए मुहम्मदचे मुख्यलाय होते. मसूद अज़हरने २००० च्या दशकाच्या सुरुवातीला जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. ज्याला २०१९ मध्ये दहतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
मरकज तैयबा, मुरीदके (लष्करे तैयबाचे मुख्यालय)
मरकझ तैयबा हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १८-२५ किलोमीटर अंतरावर आहे. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना या ठिकाणीच प्रशिक्षण दिले गेले होते. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यांनीही येथे प्रशिक्षण घेतले होते. मुरीदके येथील मरकज तैयबा हे हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय होते.
सरजल, तेहरा कला (जैशे महंमदचा तळ)
आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त ६ किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ आहे. हे एक दहशतवादी लाँचपॅड आहे ज्याचा वापर दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी केला जात होता.
महमूना जोया, सियालकोट (हिज्बुल मुजाहिदीनचा प्रशिक्षण तळ)
आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 15 किमी अंतरावर असलेले हे ठिकाण पाकिस्तानी पंजाबमधील सियालकोट जिल्ह्यात आहे. जम्मूमध्ये घुसखोरीसाठी वापरला जाणारा हा एक प्रशिक्षण केंद्र आहे. सय्यद सलाहुद्दीन हा बंदी घातलेल्या दहशतवादी गट हिजबुल मुजाहिदीनचा अध्यक्ष आहे.
पाकव्याप्त काश्मीर
-मरकज अहले हदीस, बर्नाला कॅम्प, भिंबर (लष्करे तैयबाचा तळ)
आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 15 किमी अंतरावर असलेले हे ठिकाणी पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मध्ये आहे, बर्नाला शहराजवळील मरकज अहले हदीस बर्नाला हे लष्कराचे प्रमुख तळ म्हणून काम करते. ते पूंछ, राजौरी आणि रियासी सारख्या क्षेत्रांमध्ये घुसखोरीला पाठिंबा देते, जिथे १००-१५० दहशतवाद्यांना राहता येते.
-मरकज अब्बास, कोटली (जैशे महंमदचा तळ)
कोटली येथील मरकझ अब्बास हे जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आणखी एक ठिकाण आहे . येथे १००-१२५ दहशतवादी आहेत आणि ते राजौरी-पूंछ सेक्टरमध्ये हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात सहभागी आहेत.
-मरकज राहील शाहीद, कोटली (हिज्बुल मुजाहिदीनचा प्रशिक्षण तळ)
कोटली येथील मस्कर राहिल शाहिद सुविधा हिजबुल मुजाहिदीनच्या सर्वात जुन्या प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. येथे सुमारे १५०-२०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते, जे स्नायपिंग, डोंगराळ प्रदेशात टिकून राहणे आणि बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या रणनीती यासारख्या विशेष प्रशिक्षणांवर लक्ष केंद्रित करतात.
-सवाईनाला कॅम्प, मुझफ्फराबाद (लष्करे तैयबाचा तळ)
लष्कर-ए-तोयबाचे आणखी एक प्रमुख प्रशिक्षण केंद्र, शवाई नल्लाह कॅम्प , ज्याला बैत-उल-मुजाहिदीन म्हणूनही ओळखले जाते, ते मुझफ्फराबाद येथे आहे. लष्कर-ए-तोयबाच्या ऑपरेशनल इतिहासात या कॅम्पने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, २६/११ च्या मुंबई घटनेतील हल्लेखोरांना तिथे प्रशिक्षण मिळाले होते.
या सुविधेत धार्मिक आणि सामरिक प्रशिक्षण दिले जाते, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्य शस्त्रास्त्र प्रशिक्षणात मदत करते. फॉरवर्ड लाँचिंग साइट्सवर पाठवण्यापूर्वी येथे २५० पर्यंत कॅडरना प्रशिक्षण दिले जाते.
-सैयदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद (जैशे महंमदचा तळ)
मुझफ्फराबादमधील लाल किल्ल्यासमोरील मरकज सय्यदना बिलाल हे पीओजेकेमध्ये जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख ट्रान्झिट हब म्हणून काम करते. येथे कधीही ५०-१०० दहशतवाद्यांची उपस्थिती असते.
या केंद्रातील प्रशिक्षण पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (एसएसजी) द्वारे समर्थित आहे. ज्यामुळे घुसखोरीच्या सक्रिय नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये त्यांची भूमिका आणखी मजबूत होते.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कोणते दहशतवादी मारले गेले?
मोहम्मद आलम
-लश्कर-ए-तैयबाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम.
मोहम्मद इकबाल
-धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल.
मसूद अजहर याचा भाऊ
-हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ.
मसूद अजहरचा भाऊ
-मौलाना मसूद अजहर याचा भाऊ या कारवाईत ठार झाला. याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
रऊफ असगरची पत्नी
-मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.
रऊफ असगरचा मुलगा
-भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा मृत्यू झाला आहे.
लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी
-लष्कर ए तय्यबाचे दहशतवादी वकास आणि हसन.
लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी
-लष्कर ए तय्यबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सिर यांचा खात्मा केला आहे.