Saturday, June 21, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी ; युट्यूबर ज्योतीचे सगळेच कारनामे उघड?

News Desk by News Desk
May 18, 2025, 12:57 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Jyoti Malhotra Case: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाची परिस्थीती निर्माण झाली होती.परंतु याच परिस्थितीदरम्यान पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागातून नुकतेच 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीचा देखील समावेश आहे.

​​कोण आहे ज्योती मल्होत्रा:
ज्योती मल्होत्रा ही हरियाणामधील ​​हिसारची रहिवासी आहे.  तिचे ‘ट्रॅव्हल विथ जो’ या नावाचे युट्यूब चॅनेल आहे. ती या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंगचे व्हिडीओ टाकत असते. विशेष म्हणजे त्यामध्ये ती देश-विदेशातील पर्यटनस्थळाच्या भेटीचे देखील व्हिडीओ अपलोड करते. तिच्या या व्हिडीओंना चांगला प्रतिसाद मिळतो. ज्योती मल्होत्राचे यूट्यूबवर ३.७७ लाखहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तर फेसबुकवर तिचे ३.२१ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत. नुकतीच ज्योतील पाकिस्तानसाठी हेरागिरी केल्या प्रकरणी  अटक करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय:

ज्योतीने पाकिस्तानला भेट दिलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केले आहेत. परंतु ज्योती मल्होत्रावर ​​बऱ्याच काळापासून भारतीय सुरक्षा एजन्सी नजर ठेवून होती. त्यानंतर 15 मे रोजी सकाळी 9.30 वाजता हिसार पोलीस अधिकाऱ्यांनी सुमारे अर्धा तास तिच्या घराची झडती घेतली. त्यानंतर पोलिसांनी तिला सरकारी गोपनीय कायदा आणि भारतीय न्याय संहिता 152 अंतर्गत अटक केली आहे.

हिसार पोलिसांनी ज्योतीला अटक केल्यानंतर काय माहिती दिली :

-ज्योतीच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही संशयास्पद माहिती सापडल्याची माहिती हिसार पोलिसांनी दिली आहे.

-ज्योतीला पाच दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे आणि चौकशी सुरू आहे. ती सतत एका पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होती याबद्दल सविस्तर माहिती मागवली जाणार आहे, असे हिसार पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ज्योतीचा सावळा गोंधळ:
ज्योती मल्होत्राचे पाकिस्तानमधील कारनामे नुकतेच उघडकीस आले आहे. कारण साधारणपणे जेव्हा एखादा भारतीय नागरिक पाकिस्तानला भेट देतो, तेव्हा त्याच्यावर पोलिस पातळीवर लक्ष ठेवले जाते. तो फक्त व्हिसामध्ये नमूद केलेल्या ठिकाणी जाऊ शकतो. मात्र ज्योतीला पाकिस्तानमध्ये व्हीआयपी वागणूक मिळत असे. तिला पाकिस्तानी पोलिसांकडून सुरक्षा देखील दिली जात होती. एवढेच नाहीतर ती पाकिस्तानातील हाय प्रोफाइल पार्ट्यांमध्ये सहभागी होत असे. तसेच पाकिस्तान दौऱ्यादरम्यान ती पाकिस्तान गुप्तचर संस्थांना तसेच इतर उच्च अधिकाऱ्यांना भेटत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

ज्योतीची पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी कशी ओळख झाली:

ज्योतीने पोलिसांना निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीला पाकिस्तान एक्सप्लोर करायचे होते. यासाठी ती २०२३ मध्ये पहिल्यांदा व्हिसा मिळविण्यासाठी नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात गेली होती. दूतावासात गेल्यानंतर ती तेथील दानिश नावाच्या पाकिस्तानी व्यक्तीला भेटली. यावेळी दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. या पहिल्या भेटीतच दानिश ज्योतील मैत्रीच्या योग्यतेचा वाटला. त्यामुळे दूतावासातून परतल्यानंतर ती व्हिसाच्या बहाण्याने दानिशशी फोनवर बोलू लागली.

त्यानंतर २०२३ मध्ये तिला पाकिस्तानचा 10 दिवसांचा व्हिसा मिळाला होता. परंतु दानिश आणि ज्योतीची मैत्री वाढल्याने दानिशने तिला पाकिस्तानात गेल्यानंतर ‘अली अहवान’ नावाच्या व्यक्तीला भेटण्यास सांगितले. दानिशच्या सांगण्यावरून ज्योती पाकिस्तानला गेल्यानंतर अली अहवानने तिच्या प्रवासाची आणि राहण्याची उत्तम व्यवस्था केली. याच अलीने अहवानने ज्योचीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थांचे अधिकारी शाकीर आणि राणा शाहबाजशी करून दिली. यावेळी ज्योतीने शाकीरचा मोबाईल नंबर घेतला. तिच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या नंबरबद्दल शंका येऊ नये म्हणून तिने तो नंबर ‘जट रंधावा’ या नावाने सेव्ह केल. या ओळखीमुळे तिने भारतात परतल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. व्हॉट्सअॅप, , टेलिग्राम आणि इतर माध्यमांद्वारे ती भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवू लागली, अशी माहिती समोर आली आहे.

ज्योतीसह पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी हेरागिरी करणारे अटक झालेले व्यक्ती कोण:
-हरियाणा पोलिसांच्या स्पेशल डिटेक्टिव्ह युनिटने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली कैथलमधील मस्तगढ गावातील रहिवासी देवेंद्र सिंग या २५ वर्षाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
देवेंद्र सिंगवर भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित माहितीसह गोपनीय लष्करी माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे.

-पंजाब पोलिसांनी गुजाला आणि यामिन मोहम्मद अशा दोन व्यक्तींना अटक केली आहे. ते पंजाबमधील मालेरकोटला येथील रहिवासी आहेत. पोलीस पथकांनी त्याच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीत असे समोर आले आहे की, हे दोघे भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानला शेअर करत होते आणि त्या बदल्यात ऑनलाइन माध्यमातून पैसे घेत असे.

दरम्यान, एकीकडे भारताचे सैन्य सीमेवर दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी आणि भारताच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव पणाला लावत आहेत. तर दुसरीकडे आपल्याच देशातले लोक  पैशांच्या हव्यासापोटी देशासोबत गद्दारी करत आहे. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

Tags: hariyanaindia pakistan warjyoti malhotra casejyoti malhotra youtuberjyoto malhotra in pakistanpunjabTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )
राज्य

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?
राष्ट्रीय

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय
आंतरराष्ट्रीय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी
राष्ट्रीय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

Latest News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.