Saturday, June 21, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

‘द वायर’ची हिंदुत्वविरोधी भूमिका उघड

News Desk by News Desk
May 18, 2025, 06:33 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

The Wire: ‘द वायर’ ही एक भारतविरोधी हिंदुत्वविरोधी बातमी देणारी वेबसाइट म्हणून उदयास येत आहे असे म्हणावे लागेल. कारण द वायरने अनेकदा भारत सरकारविरुद्ध आणि अतिरेकी मुस्लिमांच्या समर्थनार्थ सतत प्रचार मोहीम चालवल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थातच गेल्या काही वर्षांत द वायरने एक प्रमुख ‘प्रचार आउटलेट’ म्हणून प्रतिष्ठा मिळवली आहे. परंतु तरीही भारताचे उदारमतवादी पक्ष विशेषत: काॅंग्रेस पक्ष नेहमीच ‘द वायर’ या देशविरोधी माध्यम संस्थेला आंधळेपणाने पाठिंबा देत आला आहे. याच पार्श्वभूमीवर आपण अशा काही खोट्या घटना पाहू ज्या द वायर वेबसाईटने मुस्लिमांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधात चालवल्या आणि नंतर त्या बातम्या खोट्या ठरल्या.

-नुकती घडलेली घटना सांगायची झाल्यास, ८ मे रोजी द वायर वेबसाईटने एक लेख प्रसिद्ध केला. या लेखात माहिती देण्यात आली होती की, एका वरिष्ठ फ्रेंच गुप्तचर अधिकाऱ्याने केबल न्यूज नेटवर्कला सांगितले की, भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे राफेल लढाऊ विमान पाडले आहे. प्रत्यक्षात मात्र भारतीय हवाई दलाचे राफेल लढाऊ विमान पाकिस्तानने पाडल्याचा दावा तपासकांनी आणि भारत सरकारने खोटा ठरवला होता. विशेष म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटने देखील स्पष्ट केले होते की, भारतीय राफेल विमान पाडल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत .

-मार्च २०२५ मध्ये जगभरातील शेअर बाजार कोसळत असताना द वायरने दावा केला की, फक्त भारतातील शेअर बाजार कोसळत आहे. यावरून द वायरची भारता विरोधातली भूमिका दिसून येते.

-२०२४ मध्ये महाराष्ट्र विधासभा निवडणुकीच्या वेळीही मतदारांमध्ये मतभेद असल्याचा दावा करणारी बनावट बातमी द वायरने प्रकाशित केली होती.

-ऑक्टोबर २०२४ मध्ये द वायर चे संस्थापक आणि संपादक एमके वेणु यांनी भारतातील 19 लाख ईव्हीएम मशिन गायब झाल्याची खोटी बातमी पसरवण्याचा प्रयत्न केला.

– १ जानेवरी २०२४ रोजी द वायरने एक वृत्त प्रकाशित केले आणि त्यामध्ये दावा केला की, भाजप ट्रेंडमध्ये फेरफार करण्यासाठी एका अ‍ॅपचा वापर करत आहे. परंतु इतर कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचे वृत्त नव्हते.

-१ सप्टेंबर २०२४ रोजी द वायरने एका शहीद बीएसएफ जवानाच्या कुटुंबाला भरपाई मिळत नसल्याची खोटी माहिती दिली. प्रेस इनफाॅरमेशन ब्युरोने याबद्दल तपासणी केली असता ही बातमी खोटी असल्याचे आढळून आले.

-द वायरने १६ जानेवारी २०२३ रोजी फेक दावा की, दिल्लीतील ब्रह्मपुरीमध्ये एक पोस्टर चिकटवण्यात आला आहे, ज्यामध्ये हिंदूंना त्यांची घरे मुस्लिमांना विकू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

– १ जुलै २०२२ रोजी द वायरने एक फेक लेख प्रकाशित केला. या लेखामध्ये द वायरने असा दावा केला की, एका तीन वर्षांच्या मुलाने सांगितले आहे की, पोलिसांनी त्याच्या आजोबांना गोळ्या घातल्या. ही बातमी नंतर खोटी ठरली होती.

-जून २०२२ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचाराबद्दलची बातमी द वायरने प्रसिद्ध केली होती. या बातमीत स्थानिक लोकांचा हवाला देत असा दावा करण्यात आला होता की, मुस्लिम समुदायाचे लोक जहांगीरपुरी येथून स्थलांतरित होत आहेत. प्रत्यक्षात मात्र असे काही घडत नव्हते.

-५ एप्रिल २०२२ रोजी द वायरने राजस्थानातील करौली येथील हिंसाचारावर एक बनावट व्हिडिओ प्रसारीत केला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुण मशिदीवर भगवा झेंडा फडकवत असल्याचे दाखवण्यात आले होते.

-फेब्रुवारी २०२०२ मध्ये ‘भारतात मुस्लिम असुरक्षित’ असा लेख जगभरात पोहचवण्यासाठी द वायरने एका तुर्की वेबसाइटशी हातमिळवणी केली होती. या वरून द वायरचे मुस्लिमांबदद्ले प्रेम दिसून येते.

– 2022 मध्ये द वायरने ‘भारत बायोटेक’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ यांच्याविरुद्ध खोटे आरोप करणारे लेख प्रकाशित केले असल्याची माहिती समोर आली आहे.

– २८ जून २०२१ रोजी काश्मीर पोलिसांनी बनावट बातम्या प्रकाशित केल्याबद्दल द वायरला कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. यावरून द वायरचा खोटेपणा उघड होतो.

– १६ जून २०२१ रोजी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्याच्या प्रकरणात द वायरने सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली.

-२४ एप्रिल २०२१ रोजी द वायरने राजनाथ सिंह यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवल्याचे मान्य केले आणि कारण दिले की, की त्या बातम्या इतर बातम्यांच्या वृत्तांवर आधारित होत्या.

-मार्च २०२१ मध्ये द वायरने डिजिटल मीडिया साइट्ससाठीच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांबाबत खोट्या बातम्या प्रकाशित केल्या.

– १५ मे २०२० रोजी दिल्लीतील जहांगीरपुरी दंगलींबद्दल जातीय हिंसाचार पसरवणाऱ्या बनावट बातम्या द वायरने प्रकाशित केल्याचे स्पष्ट झाले होते.

-५ मार्च २०२० रोज दिल्लीत झालेल्या दंगलीतील मुस्लिम आरोपींना वाचवण्याच्या दृष्टिकोणातून द वायरने खोटी बातमी प्रसारीत केली.

– द वायरने २० डिसेंबर रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करणारा एक लेख प्रसिद्ध केला. या लेखाद्वारे असा संदेश दिला की, नागरिकत्व सुधारणा कायद्या अंतर्गत सर्व मुस्लिमांना देशाबाहेर हाकलून लावले जाईल.

-द वायरने १९ नोव्हेंबर २०२५ एक बातमी प्रसिद्ध केली होती, त्यामध्ये काश्मिरी तरुण आणि काही इतर मुस्लिम तरुणांमधील झालेल्या भांडणाला काश्मिरी दृष्टिकोन देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

– २०१९ मध्ये ३७० कलम रद्द झाल्यानंतर २६ ऑगस्ट २०१९ रोजी द वायरने त्यांच्या एका व्हिडिओमध्ये असा दावा केला होता की, कलम ३७० रद्द केल्याच्या दिवसापासून काश्मीरमध्ये कोणतेही वृत्तपत्र प्रकाशित झालेले नाही. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही घडले नव्हते.

– १७ फेब्रुवारी २०१९ रोजी द वायरच्या पत्रकार अरफा खानुम शेरवानी यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मठाबद्दल  खोटी माहिती ट्विट केली.

-द वायरने फेब्रुवारी २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर डेहराडूनमधील एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांना हाकलून लावले जात असल्याची खोटी बातमी पसरवली.

-द वायरने १६ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यानंतर राजस्थानमधील एनआयएमएस विद्यापीठातील काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी शहीद जवानांचा उत्सव साजरा केल्याच्या घटनेला प्रकाशझोत देणारा लेख शेअर केला आहे, यावरून द वायरची मुस्लिमांबद्दलची आत्मियता दिसून येते.

दरम्यान, द वायरच्या या सगळ्या भूमिका लक्षात घेता द वायर ही वेबसाईट जाणून बुजूण सरकार विरोधात आणि हिंदूंविरोधात काम करत असल्याचे स्पष्ट होते.

Tags: hinduthe wirethe wire fake newsthe wire news website fake newsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )
राज्य

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?
राष्ट्रीय

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय
आंतरराष्ट्रीय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी
राष्ट्रीय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

Latest News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.