Saturday, June 21, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home आंतरराष्ट्रीय

‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशात ISRO, NSA, सह ‘या’ संस्थानी दिले महत्वपूर्ण योगदान

News Desk by News Desk
May 19, 2025, 01:20 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

७ मे २०२५ रोजी भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) या मोहिमेद्वारे पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर तात्काळ आणि अचूक हल्ले केले. या ऑपरेशनमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे भारतीय संरक्षण यंत्रणांना अत्याधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शत्रूच्या हालचालींचे अचूक निरीक्षण आणि वेळेवर प्रतिसाद देणे शक्य झाले. पण या महत्वाकांक्षी ऑपरेशनमध्ये इस्त्रोसह आणखी कोणकोणत्या सरकारी आणि खासगी संस्थांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे? याच गोष्टींचा घेतलेला हा मागोवा.

1. ISRO चे योगदान
ऑपरेशन सिंदूरमध्ये ISRO च्या उपग्रहांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. उपग्रहांनी पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्र आणि अन्य हालचालींवर अचूक लक्ष ठेवून भारतीय सैन्याला महत्त्वाची माहिती दिली.ज्यामुळे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणांना त्वरित प्रतिसाद देणे शक्य झाले. या ऑपरेशनमध्ये ६०० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात आले, पाकिस्तानकडून येणाऱ्या हवाई हल्ल्यांना थांबवण्यासाठी भारताची स्वदेशी ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणाली आणि ‘आकाशतीर’ नियंत्रण प्रणालीच्या मदतीने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. ही प्रणाली उपग्रहांकडून मिळणाऱ्या रिअल-टाइम (क्षणाक्षणाला मिळणाऱ्या) माहितीवर काम करत होती. त्यामुळे काहीही नुकसान होण्यापूर्वी काही सेकंदांतच धोका ओळखून त्यावर लगेच कारवाई करता येत होती. या महत्वाच्या प्रणालींमुळे शत्रूच्या हल्ल्यांना प्रभावीपणे प्रत्युत्तर देणे शक्य झाले.

यासंदर्भात बोलत असताना ११ मे रोजी इंफाळमध्ये झालेल्या दीक्षांत समारंभात इस्रो प्रमुख व्ही.एन. नारायण यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी इस्रोचे किमान १० उपग्रह सतत कार्यरत होते. या सर्व भारतीय उपग्रहांनी अचूकपणे काम केले. सुरुवातीला आमच्याकडे ३६ ते ७२ सेंटीमीटर रिझोल्यूशन असलेले कॅमेरे होते. पण आता भारताकडे चंद्रावरही “हाय रिझोल्यूशन कॅमेरा” असून तो जगातील सर्वोत्तम कॅमेरा आहे. तसेच, आमच्याकडे असे कॅमेरेही आहेत जे २६ सेंटीमीटरपर्यंत स्पष्ट चित्रे दाखवू शकतात.

"पाकिस्तान के साथ हाल ही में सीमा पर तनाव के दौरान भारत के उपग्रहों ने अच्छा काम किया।"

– ISRO के अध्यक्ष वी नारायणन pic.twitter.com/Gh28fW6BOw

— सनातनी हिन्दू राकेश (मोदी का परिवार) (@Modified_Hindu9) May 15, 2025

खरतर ही फक्त सुरुवात आहे. सरकारने पुढील ५ वर्षांत १०० ते १५० नवीन उपग्रह पाठवण्याची योजना आखली आहे. त्यापैकी ५२ उपग्रह खास देखरेख (गुप्तचर) करण्यासाठी असतील. हे उपग्रह भारताच्या ७,००० किमी लांब समुद्रकिनाऱ्याची आणि सीमांची २४ तास नजर ठेवतील. या उपग्रहांपैकी सुमारे निम्मे उपग्रह खाजगी कंपन्यांच्या मदतीने तयार केले जातील. त्यामुळे ते वेगाने तयार होतील आणि अधिक स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाईल.

2.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आणि इंटेलिजन्स एजन्सीचे योगदान
ऑपरेशन सिंदूरची योजना आणि अंमलबजावणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्यांनी रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग (RAW) आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) यांसारख्या इंटेलिजन्स एजन्सींशी समन्वय साधून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची माहिती गोळा केली आणि त्यावर आधारित लक्ष्य निश्चित केले.

3.खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे योगदान
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय खासगी कंपन्यांनी देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. Tata Advanced Systems, Adani Elbit, Solar Industries, ZMotion Autonomous Systems, Raphe mPhibr, आणि IdeaForge या कंपन्यांनी ड्रोन आणि लोहितरण म्युनिशन्स (loitering munitions) पुरवठा केला. उदाहरणच द्यायचे झाले तर Adani Elbit आणि Alpha Design Technologies यांनी संयुक्तपणे ‘SkyStriker’ ड्रोन विकसित केले, ज्यांचा वापर पाकिस्तानमधील हवाई संरक्षण प्रणालींवर हल्ला करण्यासाठी केला गेला.

4.इतर महत्त्वाच्या घटकांची भूमिका
ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया (DFI) या ड्रोन तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या संस्थेनेही महत्वाचे योगदान दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरले गेलेले ड्रोन आणि उपकरणांची मागणी, दर्जा आणि वापर याचे नियोजन या फेडरेशनमार्फत करण्यात आले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या संस्थेने देखील आपल्या राष्ट्रीय महामार्गांवर आपत्कालीन लँडिंग पट्टे तयार करून भारतीय हवाई दलाला अतिरिक्त रनवे उपलब्ध करून दिले

5.भविष्यातील दिशा
ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताच्या संरक्षण यंत्रणांच्या क्षमतांमध्ये वाढ झाली आहे. आगामी काळात, ISRO च्या उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून शत्रूच्या हालचालींचे अधिक अचूक निरीक्षण आणि वेळेवर प्रतिसाद देणे शक्य होईल. यामुळे भारताच्या संरक्षण यंत्रणांच्या कार्यक्षमतेत आणखी सुधारणा होईल.

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती, तर ती विज्ञान, तंत्रज्ञान, सामरिक नियोजन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होती. ISRO पासून ते खासगी ड्रोन कंपन्यांपर्यंत, गुप्तचर संस्थांपासून ते रस्ते बांधणाऱ्या NHAI पर्यंत अनेक घटकांनी एकत्र येऊन ही कारवाई यशस्वी केली. ज्यातून पुन्हा एकदा जगाला ‘आत्मनिर्भर भारत’ चे स्वरूप काय आहे? याची खऱ्या अर्थाने प्रचिती आली.

Tags: Drone Federation IndiaisroNHAIoperation sindoor
ShareTweetSendShare

Related News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !
राष्ट्रीय

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )
राज्य

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?
राष्ट्रीय

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय
आंतरराष्ट्रीय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी
राष्ट्रीय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

Latest News

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

नैसर्गिक आपत्तीमध्ये संघ करत असलेली मानवतावादी मदत !

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

सामाजिक समरसता (पंच परिवर्तन भाग -१ )

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

न्यायव्यवस्थेला फक्त हिंदू सणांचे वावडे का?

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

भारत-सायप्रस संबंधाचा नवा अध्याय

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांच्या जीवन प्रवासा विषयी

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

महाराष्ट्राच्या मातीला AI ची जोड, महाॲग्री-एआय धोरण नेमके काय आहे?

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

नक्षलवाद आणि दहशतवाद यामधील फरक भाग-2

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्रातील नक्षलवाद: उगम ते आत्मसमर्पणापर्यंतचा प्रवास

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

महाराष्ट्र ख्रिस्ती धर्मांतरणाच्या विळख्यात अडकलाय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.