Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली

News Desk by News Desk
May 22, 2025, 01:29 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Jyoti Malhotra) आज देशविरोधी कारवायांमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापासून सुरुवात झालेला प्रवास एका आंतरराष्ट्रीय गुप्तहेरगिरीच्या प्रकरणात अटक होण्यापर्यंत कसा पोहोचला, याचे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या तपासादरम्यान गद्दार ज्योतीने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ISI सोबतच्या संबंधांची कबुली दिली आहे. ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये तर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तरुण पिढीची कशी दिशाभूल केली जाते, हे दाखवणारी गंभीर केस आहे. या प्रकरणाचे बारकाईने विश्लेषण केल्यास यातील गंभीरता अधिक प्रकर्षाने समोर येते.

ट्रॅव्हल विद जो’ नावाने युट्यूब चॅनल चालवणारी ज्योती एक चर्चित चेहरा मानली जात होती. तिच्या यूट्यूब चॅनेलला 3.78 लाख सब्सक्रायबर्स आहेत. इन्स्टाग्रामवर 1.33 लाख फॉलोअर्स, तर फेसबुकवर तब्बल 3.21 लाख फॉलोअर्स आहेत. ती मनाली, मसुरी, जैसलमेर, जयपूर, काश्मीरसारख्या पर्यटन स्थळांवरील व्ह्लॉगमुळे खूप प्रसिद्ध झाली होती. सोशल मीडियावरचा तिचा प्रभाव मोठा होता पण कदाचित हाच प्रभाव ISI च्या लक्षात आला.

ज्योतीची ISI सोबत संबंधांची सुरुवात
तपास यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, ज्योतीची ओळख पाकिस्तानच्या दूतावासातील कर्मचारी दानिश उर्फ एहसान उर रहीम याच्याशी झाली. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात ती त्याला अनेक वेळा भेटली. एक डिनरच्या बहाण्याने झालेली ही ओळख पुढे गुप्तचर जगतातील संबंधांमध्ये कशी रूपांतरित झाली, हे या तपासातून उघड झाले. याच दरम्यान, तिला अली हसन नावाच्या ISI अधिकाऱ्याने संपर्क केला होता‌. अली हसन आणि त्याचे सहकारी शाकीर, राणा शाहबाज यांच्याशी तिच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या होत्या. ISI ने तिला अंडरकव्हर एजंट्सबाबत माहिती गोळा करण्याचे काम दिले होते.

4. देशविरोधी संवाद आणि सोशल मीडियाचा वापर
व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून पाकिस्तानातील एजंट्सशी संवाद साधत असल्याची कबुलीही ज्योतीने दिली आहे. तिच्या मोबाईलमध्ये ‘जट रधाँवा’ या नावाने सेव्ह केलेला क्रमांक प्रत्यक्षात शाकीर या ISI एजंटचा होता. या चॅट्समध्ये देशातील सुरक्षा यंत्रणांबद्दल, अंडरकव्हर एजंटबद्दल आणि संवेदनशील ठिकाणांबद्दलची माहिती शेअर केली जात असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

पाकिस्तान दौरे आणि गुप्त भेटी
ज्योतीने कबुल केले की, दानिश आणि अली एहसान यांच्या मदतीने तिने दोन वेळा पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यांमध्ये तिने लाहोर आणि इस्लामाबादमध्ये ISI अधिकाऱ्यांशी गुप्त बैठकाही घेतल्या होत्या. यामध्ये अनेक “टास्क” तिच्या हाती सोपवले गेले. पाकिस्तान दौऱ्याचा संपूर्ण खर्च पाकिस्तानी एजंट्सकडून भागवण्यात आला होता.

Jyoti Malhotra confesses link with Pakistani official before Pahalgam attack, say police.
A major twist in the investigation.
Follow @TradeRake for breaking news and real-time updates.#BreakingNews #PahalgamAttack #JyotiMalhotra #IndiaNews #SecurityUpdate #TradeRake #NewsAlert pic.twitter.com/dM8Z1WHsXc

— Trade Rake (@trade_rake) May 21, 2025

शेवटची चिठ्ठी आणि अटक:
तपास यंत्रणांनी ज्योतीला अटक करताना तिच्या घरातून एक चिठ्ठी हस्तगत केली. ही चिठ्ठी तिने घरातील मोलकरीण ‘सविता’साठी लिहिली होती –
“सविता को कहना फ्रूट ला दे। घर का ख्याल रखे, मैं जल्दी जाऊंगी।” या चिठ्ठीत एका औषधाचे नाव, डॉक्टरचा उल्लेख आणि शेवटी लिहिले होते – “Love you… Khush-Mush”

नेमकी कोण आहे ज्योती मल्होत्रा?
ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार जिल्ह्यातील राहणारी असून ती मध्यमवर्गीय कुटुंबातून आली आहे. तिचे वडील हरिश मल्होत्रा निवृत्त कर्मचारी असून दोघे एका छोट्याशा घरात राहत होते. शिक्षणानंतर, आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे ज्योतीने लवकरच नोकरीच्या शोधाला सुरुवात केली. तीने सुरुवातीला एका कोचिंग क्लासमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी केली, त्यानंतर एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणूनही काही काळ काम केले. मात्र, ती कोणत्याही नोकरीत फार काळ टिकली नाही. पैशाच्या हव्यासापोटी ती सतत नोकऱ्या बदलत राहिली. मनासारखे आयुष्य जगता येत नसल्याने तिची महत्त्वाकांक्षा लवकरात लवकर श्रीमंती, प्रसिद्धी आणि लक्झरी जीवनशैली मिळवण्याकडे झुकली. यावरुन तिच्यात संघर्षाचा अभाव होता हे प्रकर्षाने दिसून येते.

गंभीर गुन्ह्यांमुळे ज्योतीला जन्मठेप होण्याची शक्यता
दिल्लीचे वकील अनिल कुमार सिंह श्रीनेत यांच्या म्हणण्यानुसार, ज्योतीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम १५२ तसेच अधिकृत गोपनीयता कायदा, १९२३ मधील कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यांखाली दोषी ठरल्यास शिक्षा किमान ३ वर्षांपासून सुरू होऊन जन्मठेपेपर्यंत होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं झाले, तर ज्योतीवर अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत की, तिला कमीत कमी ३ वर्षांची आणि जास्तीत जास्त जन्मभर तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

शेवटी ज्योतीने तिच्या सोशल मीडियावरून मिळालेली लोकप्रियता आणि प्रभाव याचा वापर देशविरोधी हेतूसाठी केला हे दिसून येते‌. खरतर ही चिंताजनक बाब आहे. एका साध्या व्हिडिओ क्रिएटरपासून थेट परकीय गुप्तचर संस्थेपर्यंतचा प्रवास काही तासात होत नाही. तिचा हा प्रवास महत्त्वाकांक्षा, नैतिक अधःपतन आणि हव्यासाने व्यापलेला होता. बरं हा हव्यास फक्त तिच्या स्वतःपुरता सीमित राहिला नाही तर तो देशाच्या सुरक्षेवर गदा आणणारा ठरला. पैशांसाठी देशाशी गद्दारी करणे हा गुन्हा आहेच पण त्याचबरोबर तो आपल्या जन्मभूमीविषयी असलेल्या विश्वासाचा आणि निष्ठेचा घोर अपमान देखील आहे. ज्योतीने केवळ कायद्याचे उल्लंघन केले नाही, तर तिने एका शिक्षक आणि नागरिक या भूमिकेतील जबाबदारीलाही काळीमा फासला.

Tags: Investigationjyoti malhotra caseJyoti malhotra confessespakistan connection
ShareTweetSendShare

Related News

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही
राष्ट्रीय

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार
राष्ट्रीय

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे
इतिहास,संस्कृती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती
इतिहास,संस्कृती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.