Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

News Desk by News Desk
Jun 6, 2025, 06:59 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Jasbir Singh Case: एकीकडे आपल्या देशाचे सैनिक आपला जीव धोक्यात घालून सीमेवरती संरक्षणासाठी उभा आहेत. तर दुसरीकडे काही लोक मात्र पैशासाठी देशासोबत गद्दारी करत आहेत. काही दिवसांपूर्वी हरियाणामधील ​​हिसारची रहिवासी असलेली प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला(jyoti Malhotra) पाकिस्तानसाठी(Pakistan) हेरागिरी केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अर्थातच युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पंजाब पोलिसांनी(Punjab Police) आणखी एका युट्यूबरला हेरागिरी प्रकरणी अटक केली आहे. ‘जसबीर सिंग'(Jasbir Singh) असे या युट्यूबरचे नाव असून त्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे.

कोण आहे जसबीर सिंग: (Who is Jasbir Singh?
-जसबीर सिंग पंजाब राज्यातील रुपनगरमधील महालन गावचा रहिवासी आहे. तो पंजाबमधील एक प्रसिद्ध यु्ट्यूबर आहे. त्याचे ‘जान महल’ नावाचे युट्यूब चॅनेल आहे. या चॅनलवर १० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. तो आपल्या युट्यूब चॅनेलवरती विविध ठिकाणी भेट देऊन प्रवासाचे व्हिडीओ शेअर करतो. त्याने आतापर्यंत आपल्या चॅनेलवर मलेशिया, मालदीव यांसारख्या परदेश दौऱ्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. विशेष म्हणजे त्याने आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानचा दौरा करत व्हिडीओ शेअर केले आहेत. २०२१ मध्ये दोनदा आणि २०२४ मध्ये एकदा त्याने पाकिस्तानला भेट दिली आहे. या भेटींच्या नोंदी स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलद्वारे(SSOC) तपासल्या जात आहेत. तसेच पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याच्या ओरापाखाली त्याच्या विरोधात बीएनएसच्या कलम १५२, ६१ (२) आणि अधिकृत गुपिते कायदा १९२३ च्या कलम ३, ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जसबीर सिंग पाकिस्तानला कशी मदत करत होता?

-पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जसबीर सिंगचे पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी शाकीर उर्फ ​​जुट रंधावाशी जवळचे संबंध होते. जसबीर पाकिस्तानची प्रमुख गुप्तचर संस्था ‘इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस’ (ISI) साठी काम करत असल्याचा संशय आहे. जसबीरची पाकिस्तानी नागरिक आणि दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील माजी अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशीही चांगले संबंध होते. या दानिशला काही दिवसांपूर्वी भारत सरकारने ‘पर्सन नॉन ग्रेटा’ अर्थातच अनावश्यक व्यक्ती म्हणून घोषित करून  13 मे 2025 रोजी भारतातून त्याला हद्दपार केले आहे.

-पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसबीर सिंग दानिशच्या निमंत्रणावरून दिल्लीतील ‘पाकिस्तान राष्ट्रीय दिन’ कार्यक्रमात पहिल्यांदा सहभागी झाला होता. या कार्यक्रमात तो पाकिस्तानी लष्करी अधिकारी आणि व्लॉगर्सना भेटला होता.

-तो जेव्हा पाकिस्तानगला गेला होता तेव्हा पाकिस्तामध्ये त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली गेली. त्यामुळे जसबीर याला भाळला. त्यामुळे त्याने आपल्या व्हिडीओमध्येही पाकिस्तानमधील चांगल्या बाजू दाखवल्या. त्यानंतर शाकीरने त्याचे ब्रेनवाॅश करायला सुरवात केली. तेव्हापासून जसबीर पाकिस्तानसाठी हेरागिरी करू लागला.

-जसबीर सिंग भारताच्या लष्कराच्या कारवायांशी संबंधित माहिती, व्हिडिओ आणि ठिकाणे पाकिस्तानी हँडलर्सना पाठवत असत अशी माहिती समोर आली आहे.

– जसबीरने यापूर्वी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, जसबीर सिंग पाकिस्तान पोलिसांचे कौतुक करत आहे. तसेच व्हिडीओत, पाकिस्तानी पोलिसही जसबीर मिठी मारत आहेत.

– तसेच जसबीरच्या युट्यूबवर आणि इंस्टाग्रोमवर इतरही काही संशायस्पद व्हिडीओ आढळले आहेत. आता त्याची चौकशी पोलीस करत आहेत.

-जसबीरला अटक करताना त्याच्याकडून मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह, नकाशे आणि काही संवेदनशील कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.

– तसेच त्याच्या बँक खात्यांच्या चौकशीत धक्कादायक व्यवहार समोर आले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

– पाकिस्तानच्या पोलिस आणि लष्कराने जसबीरला पाकिस्तानामध्ये गेल्यावर विशेष सुरक्षा पुरवली होती तसेच त्याला सुरक्षा देत पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात नेले होते, अशी माहिती उपलब्ध आहे.

ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंगचे कनेक्शन: (Jyoti Malhotra and Jasbir Singh’s connection)

जसबीरने एप्रिल २०२४ मध्ये त्याच्या इंस्टाग्राम अकाऊट ‘जनमहल व्हिडिओ’ वरती एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानमधील एका ​​पाकिस्तानमधील एका दुकानात सूट खरेदी करताना दिसत आहे.

-जसबीj आणि ज्योती दोघेही दानिशच्या खूप जवळचे होते.

-ज्योती मल्होत्राची चौकशी करताना जसबीरचे नाव समोर आले होते. परंतु जसबीरने संशयाच्या भोवऱ्यात येऊ नये म्हणून या पीआयओंशी झालेल्या संभाषणाच्या सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

-विशेष म्हणजे ज्योती मल्होत्राशी ओळख झाल्यानंतर जसबीर पाकिस्तानी दूतावासाला भेटला होता.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून १४ हून अधिक देशद्रोहींना अटक करण्यात आली आहे. तसेच ज्योती मल्होत्रा आणि जसबीर सिंग यांच्या प्रकरणांमुळे सुरक्षा यंत्रणेंमध्येही अधिक सतर्कता निर्माण झाली आहे, त्यामुळे आता सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या हेरागिरीच्या प्रकरणावरती कडक नजर ठेऊन अशा प्रकरणांना आळा बसेल.

Tags: danishjasbir singh casejyoti malhotra casejyoti malhotra jasbir singh relationpakistanTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार
राष्ट्रीय

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे
इतिहास,संस्कृती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती
इतिहास,संस्कृती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना
राष्ट्रीय

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.