नुकत्याच समोर आलेल्या सांगलीमधील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येच्या घटनेने धर्मांतराच्या नावावर चालणारी फसवणूक, भावनिक छळ आणि दडपशाही यांसारख्या गंभीर प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फोडली आहे. सात महिन्यांची गर्भवती आणि उच्चशिक्षित असलेल्या ऋतुजावर, लग्नानंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा सतत मानसिक दबाव टाकण्यात आला. सासरच्या मंडळींनी स्वतःला हिंदू असल्याचे भासवून तिची फसवणूक तर केलीच पण त्याचबरोबर तिच्या श्रद्धा, पूजा-पद्धती, आणि आणि तिची हिंदू ओळख पुसून टाकण्यासाठी तिच्यावर वारंवार दडपण टाकले गेले, तिला अनेकदा सांगलीतील चर्च आणि मिरजमधील खतिबनगर येथील एका शेडमध्ये चालणाऱ्या चर्चमध्ये जबरदस्तीने नेण्यात आले. जिथे तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव टाकला गेला. चर्चच्या पाद्र्यांनी तिच्या सासरच्या लोकांना असेही सांगितले की, तुमची सून हिंदू धर्माचे पालन करते, म्हणूनच तुम्हाला त्रास होत आहे.
उच्चशिक्षित M.sc झालेल्या सुशिक्षित घरातील ऋतुजाने सात महिन्याची गरोदर असताना आत्महत्येचे पाऊल उचलले यावरूनच लक्षात येते की ऋतुजा हिला धर्मांतरण करण्यासाठी किती त्रास देण्यात आला होता तसेच तिच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता.
ऋतुजा हिच्या आत्महत्येवरून हे स्पष्ट होते की, कौटुंबिक स्तरावरीलअश्या धर्मांतरणाचा दबाव हाही कौटुंबिक हिंसाचाराचाच एक प्रकार आहे. जो व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण करून तिला टोकाच्या निर्णयापर्यंत जाण्यास भाग पाडतो ही घटना राज्यातील अशा अनेक घटनांचे प्रतिनिधित्व करते,
२०२० ते २०२५ मध्ये महाराष्ट्रात समोर आलेल्या अश्या काही निवडक घटना खालीलप्रमाणे
१. शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी उचाळेवस्ती येथे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सात जणांच्या एका गृपने संगनमताने हिंदू कुटुंबावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा दबाव टाकल्याचा प्रकार समोर आला आहे
बायबल वाचा, ख्रिश्चन धर्म स्वीकारा, आम्ही आर्थिक मदत करू असे सांगून आरोपींनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा अपमान करण्यात आला आणि त्यांच्या घरातील हिंदू देव-देवतांविषयी अपशब्द वापरण्यात आले.
https://www.jaimaharashtranews.com/maharashtra-marathi-news/shirur-religious-conversion-case-seven-booked-for-luring-hindu-family-with-money/36333
May 03 2025
३. धर्मांतरासाठी महिलेवर सामूहिक बलात्कार:पुण्यात 3 जणांनी कडून बंदुकीच्या धाकावर केला अत्याचार; VIDEO व्हायरल करण्याची धमकी
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/pune/news/pune-gang-rape-case-controversy-update-religious-conversioncase-134350207.html
January २०२५
४. एका धक्कादायक प्रकरणात, महाराष्ट्र पोलिसांनी रविंदरसिंग भंवरसिंग राजपुरोहित या ख्रिश्चन व्यक्तीविरुद्ध २१ वर्षांपासून आपल्या पत्नीचा छळ आणि शारीरिक छळ केल्याबद्दल आणि तिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याबद्दल एफआयआर दाखल केला आहे. ३ डिसेंबर रोजी पुण्यातील येरवडा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील येरवडा परिसरातील रहिवासी रविंदरसिंग भंवरसिंग राजपुरोहित यांनी २१ वर्षांपूर्वी आपला धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. तेव्हापासून तो आपल्या पत्नीला आणि तिच्या पालकांना आणि मुलांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. तो आपल्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करायचा आणि मुलांना ख्रिश्चन शाळेत पाठवण्याची धमकी द्यायचा.
तक्रारीत महिलेने नमूद केले आहे की आरोपीने हिंदू देव-देवतांच्या मूर्ती नदीत फेकून तिच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. घरात बसवलेले धार्मिक फोटोही त्याने फेकून दिले
https://www.opindia.com/2022/12/pune-man-beat-wife-21-years-christianity-conversion/6
December, 2022
६. बलात्काराच्या खोट्या आरोपामुळे वर्षभर तुरुंगवास भोगावा लागलेल्या श्रीकांत खंदारे यांची जामीनावर सुटका झाली. सोमवार, दि. २४ जानेवारी रोजी दिंडोशी सत्र न्यायालयाकडून याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ख्रिश्चन धर्म न स्वीकारल्याने तरुणीने खोट्या बलात्काराच्या आरोपात श्रीकांत यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता.
२०१९ मध्ये श्रीकांत आणि तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर २०१९ पासून दोघेही नवी मुंबईत राहत होते. त्यावेळी तरुणीने श्रीकांत यास लग्न करण्यापूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. या गोष्टीस नकार दिल्याने तरुणीने श्रीकांत यांच्यावर खोट्या बलात्काराचा आरोप करण्यात आला होता.
https://www.mahamtb.com/Encyc/2023/1/28/fake-rape-case-allegations.amp.html
28 Jan 2023
६. . सोलापूर येथील एका विवाहितेला लग्नानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती करण्यात आली ,तसेच देवपूजा आणि रक्षाबंधन सारखे सण साजरे करण्यास मनाई करण्यात आली.
https://www.lokmat.com/solapur/deva-worship-opposition-to-rakshabandhan-by-forcing-them-to-accept-christianity-married-complaint-a-a500-c755
ऑगस्ट २३,२०२३
७. महाराष्ट्र राज्यातून धर्मांतराच्या एका भयानक प्रकरणात, पुणे जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यात आले. अलिकडेच ज्या मुलींनी त्यांच्या आईला गमावले होते त्यांना सुरुवातीला दौंड भागातील एका अनाथाश्रमात जबरदस्तीने पाठवण्यात आले होते जिथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आणि जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) या घटनेची दखल घेतली आणि या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. २४ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये, NCPCR ने म्हटले आहे की दोन्ही अल्पवयीन मुलींना बायबल वाचायला लावण्यात आले. अनाथाश्रमातील दोन्ही मुलींना छळण्यात आले आणि त्यांना अॅसिडने शौचालये स्वच्छ करण्यास आणि अल्पवयीन मुलांनी करू नये अशी कामे करण्यास भाग पाडण्यात आले, असेही म्हटले आहे.
https://www.opindia.com/2023/11/beaten-tortured-forcibly-converted-to-christianity-two-minor-girls-confined-in-pune-orphanage/
28 November, 2023
८. ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला जबरदस्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नाही तर या महिलेला एका घरात डांबून ठेवत तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला आहे. हा संपूर्ण प्रकार विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर धानोरी इथे घडला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे
https://www.navarashtra.com/crime/a-woman-has-been-forcibly-tortured-in-pune-to-convert-to-christianity-nrdm-762458.html 24, 2025
या सर्व घटनांचा आढावा घेतला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून ख्रिस्ती धर्मांतरण करण्याच्या घटनांचे प्रमाण यात आहेच, पण त्याचबरोबर या घटनांमध्ये केवळ मानसिक दबावच नाही, तर आमिषांपासून (मोफत वैद्यकीय मदत, धान्य,पैसे) पासून ते थेट शारीरिक हिंसा, लैंगिक अत्याचार आणि धमक्यांपर्यंतच्या दबावतंत्राचा यात वापर केला जात आहे. भारतातील महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये, प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये, बळजबरीने धर्मांतर आणि संबंधित गुन्हेगारीची अनेक गंभीर प्रकरणे उघडकीस आली आहेत. यात फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणाचा वापर करून धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचेही समोर आले आहे.
ख्रिश्चन धर्मांतर किती प्रकारे केले जाते ?
1. समाजसेवेच्या आणि गरजू रुग्णांच्या मदतीच्या नावाखाली केले गेलेले धर्मांतरण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहे. यामध्ये ‘चमत्कार’ आणि ‘उपचार सभा’ घेतल्या जातात. रुग्णांना बरे वाटेल या साठी ‘येशूची प्रार्थना ‘ केली जाते किंवा लाल सरबत दिले जाते. नुकताच असा प्रकार पुणे येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल कॅम्प येथे शासकीय रुग्णालयात बघायला मिळाला मेघा जगताप नावाची महिला पास्टर हॉस्पिटल मधील रुग्णांकडून येशूची प्रार्थना करीत धर्मांतरण करण्यासाठी मार्गदर्शन कथन करीत असताना आढळून आली. संबंधित पास्टर महिलेसोबत बॅग मध्ये लाल पाण्याच्या बाटल्या, पैशांची पाकिटे आढळून आले आहे.मात्र महिलेला रुग्णालयाच्या आत मध्ये जाऊन थेट रुग्णांना हे सरबत देण्याची परवानगी कुठल्या अधिकाऱ्याने दिली हे समोर आलेले नाही.
https://www.instagram.com/sakal_hindu_samaj__/reel/DFu9ariKNfZ/
https://x.com/eOrganiser/status/1611345539463000064
२. शहरी भागांमध्ये असे कार्यक्रम मिशनरी संस्थाकडून आयोजित केले जातात. ज्यात आजार बरे करण्याच्या नावाखाली चमत्कार दाखवून लोकांना आकर्षित केले जाते. तसेच प्रार्थनेसाठी बोलवून कसे सकारात्मक वाटू शकते असा आभास निर्माण केला जातो. तुम्ही असे दोन तीन वेळा गेलात की अश्या धर्मांतर केलेल्या काही लोकांसोबत तुमची चर्चा घडवून आणतात.अश्या प्रकारची प्रार्थना केल्यास कसा फरक पडेल हे या चर्चांमधून पटवून दिले जाते.
3. अमिषे दाखवून किंवा बळजबरीने केलेले धर्मांतरण
वेगवेगळ्या युक्त्या वापरून वेगवेगळी आमिषे प्रलोभने दाखवून धर्मांतराचे प्रयत्न केले जातात. आदिवासी पाड्यामधून किंवा छोट्या गांवामध्ये खूप वेळा सरळ पैशांची मदत केली जाते. किंवा जीवनोपयोगी वस्तू दर महिन्यात वाटल्या जातात. आणि जर धर्म स्वीकारला तर हे मिळेल ते मिळेल ही वचने दिली जातात. हे मोठ्या प्रमाणात गावांतून, आदिवासी वस्त्यांतून घडते. साध्या बिर्याणीच्या आशेवर गरिब लोक चर्चमध्ये रविवारी जमा होतात. याला अपवाद आहेत जे स्वत: आपल्या मर्जीने धर्मांतरण करतात त्यांचा. जे काहीतरी मिळेल, आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल या अपेक्षेने ख्रिस्ती होतात,शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक वेळा आदिवासी लोकांना धर्म, अधिकार आणि कायद्याची माहिती नसते. त्यामुळे ते सहजपणे फसवले जातात.
https://x.com/noconversion/status/1259273756972900354
धर्मांतरणासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्मातरासाठी पैसा येतो. हे काम systematically केले जाते.मदत, पुण्य अश्या, प्रभूची सेवा अश्या नावांखाली आरोग्य, अन्नछत्रे, प्राथमिक शाळा, भांडीकुंडी अश्या अनेक उपक्रमाअंतर्गत हे काम सुरु राहते. आणि त्याचा विस्तार वाढत जातो.
जोशुआ प्रोजेक्ट अंतर्गत भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी ख्रिस्ती धर्मांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ठिकाणी हे Soul Harvesting नावाने खुलेआम चालते, तर काही ठिकाणी सामाजिक सेवा, शिक्षण, आणि आरोग्यसेवेच्या नावाखाली गुप्तपणे हा प्रकार घडतो. विशेषतः गरीब आणि वंचित घटकांना लक्ष्य करून, आर्थिक मदत आणि उपचाराच्या माध्यमातून त्यांना ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
देशात दरवर्षी सुमारे २४ लाख लोकांचे ख्रिस्तीकरण होत असल्याचा दावा अमेरिकेतून संचलित जोशुआ प्रोजेक्ट संकेतस्थळाने केला आहे. त्यांचा उद्देश ख्रिश्चन धर्मांतर वाढवणे, ठिकठिकाणी चर्च बनवणे, असा आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत ख्रिश्चन धर्मांतराचे काम वाढवण्यासाठी पास्टर ,पदरी,तरुण मुले यांची नियुक्ती केली जाते, त्यांना आकर्षक मानधन दिले जाते. महाराष्ट्रातील अनेक छोटी गावे, आदिवासी पाडे , तालुके या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. नवीन प्रार्थनास्थळे, चर्च यांचेही प्रमाण मुंबईच्या उपनगरांमध्ये वाढताना दिसत आहेत.
https://divyamarathi.bhaskar.com/national/news/christianization-started-by-mission-joshua-18-days-verification-in-110-villages-of-mp-chhattisgarh-jharkhand-odisha-133536778.html
https://organiser.org/2024/08/28/253823/bharat/from-research-initiative-to-conversion-activities-all-about-the-joshua-project-which-is-being-linked-to-caste-census/
ख्रिश्चन धर्मांतरण ही वेगाने पसरत चाललेली गंभीर समस्या आहे. याबद्दल आपण या लेखमालेच्या पुढच्या भागात सविस्तर जाणून घेणार आहोत.