Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राज्य

आषाढी वारी देते व्यवस्थापनाचे धडे

News Desk by News Desk
Jun 18, 2025, 06:34 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पावसाळा सुरू झाला की जून-जुलै मध्ये महाराष्ट्रात पालख्यांचे वेध लागतात. दिंड्या, पताका घेऊन मुखाने ज्ञानोबा-तुकोबांचा आणि सर्व संतांना प्रिय असणाऱ्या विठ्ठलाचा गजर करीत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात.शतकानुशतके चालू असलेल्या या सोहळ्यादरम्यान दरवर्षी देहू येथून तुकोबांची तर आळंदीहून ज्ञानोबांची पालखी पंढरपूरला विठ्ठल माऊलीच्या भेटीला जाते. महाराष्ट्रातला अलौकिक असा हा आषाढी एकादशीच्या वारीचा सोहळा जगासाठी कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. ही वारी अनुभवण्यासाठी दर वर्षी परदेशी पाहुणे येत असतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर्स, इंजिनीअर्स, आय. टी. क्षेत्रातील मंडळी, कॉर्पोरेट क्षेत्रातले आणि सरकारी अधिकारी तसेच उच्चशिक्षितांचा वारीतला सहभाग वाढतो आहे.

 यंदाच्या या 340व्या पालखी सोहळ्यात ऊन, पाऊस, वादळ, वारा कशीचीही तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठुरायाच्या भेटीची  ओढ घेऊन लाखों भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत .अनुक्रमे 18 आणि 19 जून  रोजी  देहू येथील संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होत आहे. राज्यसरकारकडून आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तसेच संपूर्ण राज्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी दिली आहे. मात्र पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर सह देहू, आळंदी मध्ये स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. अतिक्रमणे हटवून मुख्य रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. विविध ठिकाणी विद्युत दिवे बसविण्यात आले असून, आवश्यक तेथे दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली आहे. भाविकांची मोठी संख्या गृहीत धरून नगर परिषद आणि प्रशासनाने तयारी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

वारीचे व्यवस्थापन 

दरवर्षी पार पडणाऱ्या या आषाढी एकादशी वारी सोहळ्यात  संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसोबतच संत एकनाथ (पैठण), संत निवृत्तीनाथ (त्र्यंबकेश्वर), संत सोपानदेव (सासवड) आणि संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर) यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात.आणि बघता बघता या वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांचा महासागर उसळतो. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये १० ते १५ लाख भाविक एकत्र येतात. जात, धर्म,भाषा,गरीब-श्रीमंत असे सर्व भेद विसरून या वारीचे आकर्षण या जागतिक पातळीवर जाऊन पोचले आहे.

वारी म्हणजे नेमके काय ?लाखांच्या संख्येत लोक एकत्र येऊन पायी हजारो किलोमीटर चालत  तहान भूक विसरून , पाऊस ऊन यांची तमा न बाळगता पंढरपूरला माऊलीच्या ओढीने पोचतात, अशी कोणती अध्यात्मिक ओढ त्यांना पंढरपूर पर्यंत येण्यास भाग पाडते, अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, कुतूहलापोटी अनेक राज्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक  या भक्तिमार्गाचा अनुभव घ्यायला येऊन पोचतात, त्याचबरोबर वारीचा वारीच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यवस्थापकीय पैलूंचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी नागरिक, संशोधक आणि अभ्यासकही या सोहळ्यात सहभागी झालेले दिसून येतात.

 ही हजारो माणसे एवढ्या शिस्तीत कसा काय प्रवास करतात? ‘ कोणत्याही एका  संस्थेच्या नियंत्रणाशिवाय, स्वयंशिस्तीत  आणि परस्पर सहकार्यावर चालणारा लाखो लोकांचा हा सोहळा व्यवस्थापनशास्त्राचा एक आदर्श ‘केस स्टडी’ समजला जातो.  याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने या अनोख्या परंपरेला जागतिक वारसा (World Heritage) दर्जा मिळावा यासाठी युनेस्को (UNESCO) कडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.वारीतील  यशस्वी व्यवस्थापनाचे गमक काही मुद्द्यांमध्ये मांडायचा हा प्रयत्न

१. दिंड्या –  दिंडी म्हणजे वारीच्या प्रवासात शिस्तबद्ध पद्धतीने चालणारा वारकऱ्यांचा एक संघटित गट.या दिंडीच्या माध्यमातून वारकरी या वारीमध्ये सामील होतात. शक्यतो प्रत्येक गावाप्रमाणे त्या त्या दिंडीमध्ये तेथील ग्रामस्थ सहभागी होतात. आणि पंढरपूर पर्यंत आपल्या दिंडीच्या रचनेतून हा प्रवास पूर्ण करतात. बऱ्याचदा या दिंडीमध्ये गुरुपरंपरेप्रमाणे भक्तांचा समूह सामील होतो. प्रत्येक दिंडीला नाव दिले जाते, त्याचे प्रमुख ठरवले जातात, आणि पालखीच्या मार्गावर ही दिंडी कुठल्या स्थानावर थांबणार हे निश्चित केले जाते. स्वयंशिस्त, सात्विक आहार, दिंडीकडून केली जाईल तशी सर्व ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची किंवा प्रवासाची व्यवस्था हे अलिखित नियम सर्व भक्तांकडून आपोआप पाळले जातात. किंबहुना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांना असे करण्यास भाग पाडते.

२. स्वयंस्फूर्त सहभाग

कोणतेही निमंत्रण न देता, कोणत्याही मेसेज अथवा निरोपांची देवाण घेवाण न करता  लाखो वारकरी एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होतात. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा प्रवास अतिशय शिस्तबद्धरीतीने करतात. आणि हे गेले वर्षानुवर्षे चालू आहे. त्याचबरोबर या वारकऱ्यांच्या सोयीसाठी डॉक्टरांचे पथक , टाळकरी, पखवाज वाजवणारे, हंडेवाले, पताकावाले, जेवण बनवणारे, तंबू उभारणारे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची, निवासाची व्यवस्था करणारे स्वयं प्रेरणेने वारीमध्ये सहभागी होतात. आणि वारकऱ्यांची सेवा आपण केली, तर आपली भक्ति थेट विठ्ठलांच्या चरणी रुजू होईल अश्या भावनेने बहुतांश सर्वजण आपले काम समर्पणभावनेने करतात.

3. प्रवास व्यवस्थापन आणि मुक्काम व्यवस्थापन – आषाढी वारीचा पंढरपूर पर्यंतचा हा सुमारे २१ दिवसांचा पायी प्रवास म्हणजे अक्षरशः एका ‘चालत्या-फिरत्या शहरा’चे व्यवस्थापन करण्यासारखा असतो. लाखो लोकांच्या निवासापासून ते भोजनापर्यंत आणि स्वच्छतेपासून ते आरोग्यापर्यंत, प्रत्येक गोष्टीचे नियोजन समन्वयातून केले जाते. प्रत्येक दिवसाचा प्रवास, आणि मुक्कामाचे ठिकाण यांचे वेळापत्रक अनेक वर्षांपासून ठरलेले आहे. अनेक मुक्कामाची ठिकाणे ही  संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांशी किंवा वास्तव्याशी निगडीत आहेत.

तर निवासाचे आयोजन पालख्या ज्या गावात किंवा पुण्यासारख्या शहरात थांबतील तिथल्या मोकळ्या जागेत किंवा मंदिरामध्ये केले जाते. या बाबतची परंपराही वर्षानुवर्षे चालत आलेली असते. अगदीच गरज पडलीच तर माळरानावर तंबू ठोकून तिथे विसावून हरिनामाचा गजर करण्यात हे भक्तगण तल्लीन होऊन जातात.

४. समूह व्यवस्था –  लाखो मंडळी असूनही कुठलीही गडबड, गोंधळ, चुकामुकी, हरवाहरवी या आषाढी वारीत होत नाही. चालण्याचा क्रमही ठरलेला असतो आणि तो कसोशीने पाळला जातो. शिवाय तुकोबा आणि ज्ञानोबा यांच्या पालखीसोबतचे वारकरी एकमेकांसमोर आले की ‘एकमेका लागतील पायी रे’ याचे अनुकरण करताना बघायला मिळतात. परस्परांच्या पायाची धूळ कपाळी घेण्यासाठी सारे धडपडत असतात.अशी नतमस्तक होण्याची प्रथा जगात दुसरी नसेल, अठरापगड जातींचे हे जनसमुदाय विठ्ठलदर्शनाच्या एकाच ओढीने कानाकोपऱ्यातून एकत्र येतात आणि फक्त वारकरी बनून या काळात जगतात. हातात वीणा, झांज, टाळ, ध्वज, तुळशीवृंदावन घेतात किंवा दोन हातांची टाळी धरून हरिनामात गुंग होतात आणि वारकरी हीच एक वृत्ती बनून जाते.

वारीमध्ये ना कोणी शेठ,ना अण्णा,ना भाऊ,ना दादा,ना साहेब,असतो. सगळे जण माऊलीच्या भेटीच्या ओढीने एकात्म पावतात. अहंकार आणि स्वाभिमान विसरून वाटचाल करताना दिसतात.

५. शासकीय यंत्रणा,स्थानिक समाज आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग

दिंडी हा एक ‘स्वयं-पूर्ण’ घटकाप्रमाणे काम करत असला तरी , त्याला स्थानिक समाज आणि प्रशासनाच्या सहकार्यावर अवलंबून राहावे लागते, या साधारणपणे २१ दिवसाच्या चालणाऱ्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, किंवा गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी ही सर्व यंत्रणा महत्वाची भूमिका बजावते. पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॅनेटरी नॅपकिन सुविधा, शौचालय युनिट, मेडिकल कॅम्प,हिरकणी कक्ष .अश्या व्यवस्था उभ्या केल्या जातात.जनजागृती केली जाते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणाही सज्ज असते. हे परस्परांवर अवलंबून असणारे सर्व घटक एकत्र येऊन संतुलित काम करतात, आणि दरवर्षी वारी सोहळा सुफळ संपूर्ण पार पडतो.

६. संकट व्यवस्थापन : वारी दरम्यान, वैद्यकीय आणीबाणी किंवा प्रतिकूल हवामान परिस्थितीसारखी अनपेक्षित आव्हाने उद्भवू शकतात. या सर्वांची पूर्ण कल्पना मनाशी बाळगत वारकरी प्रवास करतात, विठ्ठलभक्तीत,माऊलींच्या भक्तीत तल्लीन असणाऱ्या कोणालाही वाटेत येणाऱ्या अडचणींची अजिबात चिंता नसते.आणि दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी  शासकीय यंत्रणा आणि स्थानिकांकडून याबाबत पुरेशी काळजी घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो.

 वारीचे व्यवस्थापन ही एक गतिमान प्रक्रिया आहे जी बदलत्या परिस्थितींना सामावून घेण्यासाठी आणि कमतरता दूर करण्यासाठी दरवर्षी विकसित होताना दिसते. सतत सुधारणा करण्याची संस्कृती स्वीकारल्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रगत होताना दिसते. एवढा मोठा जनसमुदाय एकात्म भावनेने विठ्ठलाच्या नावाचा मनोभावे गजर करत पंढरपुरात पोचतो आणि विठू माऊलीच्या दर्शनाने वर्षभराची ऊर्जा मनात साठवून घेतो.

एकूण काय तर वारी हा पाहण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही. तो अनुभवण्याचा विषय आहे. वारीचा  याची देही याची डोळा ,अनुभव घेण्यासाठी मात्र प्रत्येकाच्या मनात आयुष्यातील काळज्या, चिंता, द्वेष, मत्सर अश्या सर्व भावना मागे सोडून विठ्ठलाशी एकरूप होण्याचा एकमेव ध्यास जागता राहणे गरजेचे आहे.

Tags: ashadhi variashdhi wari 2025pandharpurTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा
इतिहास,संस्कृती

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा
राज्य

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )
राष्ट्रीय

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी
इतिहास,संस्कृती

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न
राज्य

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

Latest News

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.