Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

भारत K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र चाचणी करण्याच्या तयारीत; भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेत होणार वाढ!

News Desk by News Desk
Jul 2, 2025, 06:10 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

K-6 Missile Will Increase India’s Strength: जगात बोटावर मोजण्या इतक्या देशांकडेच एडव्हान्स हायपरसॉनिक आणि MIRV-इक्विप्ड मिसाईल सिस्टम आहेत. तर काही देश यावरती काम करत आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन आणि युनायटेड किंगडम या देशांचा समावेश आहे. मात्र आता या यादीत भारताचाही लवकरच समावेश होणार आहे. कारण भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संघटना'(Defence Research and Development Organisation) म्हणजेच डीआरडीओने के-६ हायपरसोनिक क्षेपणास्त्राची पहिली सागरी चाचणी घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भारत आपल्या धोरणात्मक क्षमतांमध्ये मोठी झेप घेण्यास सज्ज झाला आहे. यामुळे आता भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याची क्षमता आणखी वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपण के-६ हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या चाचणीबद्दल आणि यामुळे भारतच्या अण्वस्त्र डागण्याच्या क्षमतेवर नेमका कसा परिणाम होईल, हे सविस्तर जाणून घेऊयात.

K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र काय आहे: (What is the K-6 hypersonic missile?)
K-6 हे पाणबुडीतून डागले जाणारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Submarine-Launched Ballistic Missile आहे. हे क्षेपणास्त्र हैदराबाद येथील डीआरडीओच्या एडव्हान्स नेव्हल सिस्टीम्स लॅबोरेटरीत (Advanced Systems Laboratory) K-6 विकसित केले जात आहे. भारताकडे असलेल्या पाणीबुडीवरुन डागता येणाऱ्या बॅलेस्टीक मिसाईल वा एसएलबीएम सारख्या K-4 ( 3,500 किलोमीटरची रेंज ) आणि K-5 (6,000 किलोमीटर पर्यंत ) चे हे अपग्रेटड व्हर्जन आहे. या आण्विक पाणबुडीला घातक वॉरहेड आणि क्षेपणास्र कॅरी करण्यासाठी विकसित केले जात आहे. भारताने समुद्र-आधारित अणु प्रतिबंधक शक्ती मजबूत करण्यासाठी हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे. त्यामुळे K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्र हे भारताचे एक अत्याधुनिक, हायपरसॉनिक सबमरीन-लाँच्ड बॅलिस्टिक मिसाईल ठरणार आहे. लवकरच K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्राची समुद्रात चाचणी घेणार आहे. हे क्षेपणास्राला भागाच्या आगामी S-5 क्लासच्या न्यूक्लीअर पाणबुडीत तैनात करण्याची भारताची योजना आहे. या आंतरखंडीय बॅलेस्टीक मिसाईल K-6 चा वेग आणि रेंज ब्रह्मोस क्षेपणास्रापेक्षाही जादा आहे. हे क्षेपणास्र भारताला पाकिस्तान आणि चीनसारख्या देशाशी मुकाबला करण्यास मदत करण्यास फायदेशीर ठरणार आहे.

K-6 क्षेपणास्त्र इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हीईकल तंत्रज्ञानाने सुसज्ज: (K-6 missile equipped with Independently Targetable Re-entry Vehicle technology)

K-6 क्षेपणास्त्र मल्टीपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हीईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहे. त्यामुळे हे एकच क्षेपणास्त्र अनेक टार्गेटना अचूकपणे निशाणा करु शकते. K-6 मिसाईल न्युक्लिअर आणि पारंपारिक असे दोन्ही दोन्ही प्रकारचे वॉरहेड कॅरी करु शकते. म्हणजेच K-6 हे क्षेपणास्त्र हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे आणि पारंपारिक अशी दोन्ही प्रकारची शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्यामुळे युद्धकाळात आणि प्रतिबंधात्मक परिस्थितींमध्येही या क्षेपणास्त्रामध्ये धोरणात्मक लवचिकता आहे असे म्हणता येईल.

K-6 क्षेपणास्त्राचा वेग: (K-6 missile speed)
K-6 क्षेपणास्राची एक खासियत म्हणजे त्याची हायपरसॉनिक क्षमता. k-6 क्षेपणास्त्राचा वेग 7.5 मॅक म्हणजे ध्वनीच्या साडे सात पट जादा असणार आहे. म्हणजे हे क्षेपणास्र दर तासाला 9,200 किलोमीटर प्रति तास वेगाने उडणार आहे. k-6 क्षेपणास्त्राची रेंजही 8,000 किलोमीटर आहे. अर्थातच एका क्षणामध्येच हे क्षेपणास्र शत्रूच्या भागात जाऊन खोलवर हल्ला करु शकते. या क्षेपणास्त्राला प्रचंड वेग असल्यामुळे हे मिसाईल एण्टी मिसाईल डिफेन्स सिस्टीमना चकवा देऊ शकते. त्यामुळे शत्रूंना प्रतिक्रीया द्यायलाही वेळ उरत नाही. अर्थातच या क्षेपणास्त्राला असणाऱ्या प्रचंड वेगामुळे एण्टी मिसाईल डिफेन्स सिस्टीम याला अडवू शकत नाहीत, हेच या क्षेपणास्त्राचे विशेष वैशिष्ट्ये ठरत आहे.

k-6 क्षेपणास्त्र ब्रह्मोसपेक्षाही अधिक घातक:( K-6 missile is more deadly than Brahmos)
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने पहिल्यांदाच युद्धभूमीवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. ब्राह्मोसने पाकिस्तानमध्ये इतका विनाश केला आहे की, पाकिस्तान कधीही विसरणार नाही. मात्र आता के-6 क्षेपणास्त्र ब्रह्मोसपेक्षाही अधिक घातक मानले जात आहे. कारण K-6 क्षेपणास्त्रामध्ये अनेक शहरे किंवा सैन्यतळ एकाच वेळी नष्ट करण्याची क्षमता आहे तर ब्रह्मोस फक्त एकाच ठिकाणी लक्ष केंद्रीत करू शकतो. म्हणजेच K-6 च्या वॉरहेडची क्षमता ब्रह्मोसपेक्षा 10 पट जास्त आहे. तसेच K-6 हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्याजवळपास जाते म्हणजेच k-6 क्षेपणास्त्र खूपच लांब पल्ल्याचे आहे. तर ब्रह्मोस तुलनेत लघुपल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. त्यामुळे k-6 क्षेपणास्त्र ब्रह्मोसपेक्षाही अधिक घातक ठरणार आहे.

K-6 क्षेपणास्त्र कोठे तैनात केले जाणार आहे?: (Where will the K-6 missile be deployed?)
K-6 क्षेपणास्त्र भारताच्या नवीन धोरणात्मक पाणबुड्यांपैकी म्हणजेच S-5 वर्गातील ((S-5 Class Nuclear Submarines) पाणबुडीवर तैनात केल जाणार आहे. नवीन पाणबुड्या अरिहंत वर्गातील पाणबुड्यांपेक्षा मोठ्या आणि अधिक शक्तिशाली असणार आहेत. या नवीन अणु पाणबुड्या १२ ते १६ के-६ क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतील.

संरक्षण क्षेत्रात भारताच्या आत्मनिर्भरतेचे एक महत्वपूर्ण पाऊल: (An important step towards India’s self-reliance in the field of defence)

K-6 क्षेपणास्त्र हे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे. कारण K-6 क्षेपणास्त्रामुळे देशाची अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान स्वतंत्रपणे विकसित करण्याची वाढती क्षमता सिद्ध होणार आहे. K-6 क्षेपणास्त्र भारतात तयार करण्यात आल्याने संरक्षण आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे देखील हे एक उत्तम उदाहरण ठरणार आहे.

के-६ क्षेपणास्त्र हे स्वदेशी संशोधन आणि विकास क्षमतांमध्ये गेल्या काही दशकांपासून केलेल्या गुंतवणुकीचे प्रतिबिंब ठरणार आहे. K-6 क्षेपणास्त्रच्या माध्यमातून झालेला हा स्वदेशी विकास दृष्टिकोन केवळ राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करणार नाही तर भविष्यातील अशा अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांसाठी एक नवीन उर्जा आणि विश्वास निर्माण करत आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोणातून K-6 क्षेपणास्त्राचा विकास भारतासाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे

k-6 क्षेपणास्त्रामुळे भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याची क्षमता आणखी वाढणार: (K-6 missile will further enhance India’s ability to launch nuclear weapons from underwater:)

आपण वर k-6 क्षेपणास्त्राच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली, त्यावरून एक स्पष्ट होते की, K-6 हायपरसॉनिक क्षेपणास्त्रामुळे भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. कारण K-6 क्षेपणास्त्र वभारताच्या आगामी S-5 श्रेणीतील न्यूक्लिअर पाणबुड्यांमध्ये तैनात करण्यासाठी विकसित केले जात आहे. पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता ही ‘सेकन्ड स्ट्राईक कॅपॅबिलिटी’ (Second-Strike Capability) प्रदान करते. म्हणजेच जर शत्रूने भारतावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला, तरीही भारताकडे समुद्राखालील पाणबुडीतून प्रत्युत्तर देण्याची क्षमता येईल.

– K-6 ची मारक क्षमता 8,000 किलोमीटर आहे. त्यामुळे सध्या भारताकडे असलेल्या K-4 म्हणजेच 3,500 किमी आणि K-5 म्हणजेच6,000 किमी या क्षेपणास्त्रांपेक्षा K-6 ची मारक क्षमता जास्त ठरणार आहे. परिणामी भारतीय पाणबुड्या आपल्या सुरक्षित सागरी हद्दीत राहूनही कितीही K-6 क्षेपणास्त्राच्या माध्यमातून लांबच्या शत्रूवर हल्ला करू शकतात.
अर्थातच K-6 क्षेपणास्त्रामुळे पाणबुड्यांना शत्रूच्या जवळ जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे सागरी सुरक्षिततेत देखील K-6 मुळे वाढ झाली आहे, असे म्हणता येईल.

-K-6 मध्ये MIRV तंत्रज्ञान वापरले गेले आहे त्यामुळे एकाच पाणबुडीतून एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची भारताची क्षमता वाढली आहे.

-विशेष म्हणजे पाणबुडीतून डागलेली क्षेपणास्त्रे जमिनीवरून किंवा विमानातून डागलेल्या क्षेपणास्त्रांपेक्षा शोधायला कठीण असतात. त्यातच K-6 हे क्षेपणास्त्र पाण्याखालून लाँच होणारे असल्यामुळे शत्रूला त्याचा पत्ता लागणे कठीण असते. विशेष म्हणजे खोल समुद्रात लपलेली S-5 पाणबुडी कोणत्याही क्षणी, कुठूनही K-6 लाँच करू शकते.

विशेष म्हणजे K-6 क्षेपणास्त्र भारताच्या नवीन S-5 अणुऊर्जा चालित पाणबुडींवर तैनात होणार आहे आणि नवीन S-5 अणुऊर्जा चालित पाणबुडी या अधिक वेळ पाण्याखाली राहू शकतात, तसेच आधीच्या पाणबुडीपेक्षा जास्त क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात त्यामुळे शत्रूवर अधिक मजबूत अण्वस्त्र हल्ला करणे शक्य होणार आहे.

या सगळ्यातून हे स्पष्ट होते की, K-6 क्षेपणास्त्रामुळे भारताची पाण्याखालून अण्वस्त्र डागण्याची क्षमता केवळ वाढणार नाही, तर ती अधिक विश्वसनीय, अचूक आणि भेदक बनणार. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची सामरिक शक्ती देखील आणखी वाढणार आहे.

दरम्यान, K-6 हायपरसोनिक क्षेपणास्त्र भारताच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेतील एक परिवर्तनकारी कामगिरी मानली जात आहे. तसेच K-6 हायपरसोनिक क्षेपणास्त्र हे भारताच्या आत्मनिर्भरतेचा एक मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे हे क्षेपणास्त्र केवळ देशाचे रक्षण करणार नाही, तर स्वदेशी तंत्रज्ञान, उद्योग, विज्ञान, संशोधन आणि सामरिक निर्णयक्षमतेला बळकटी देणारे एक शक्तिशाली प्रतीक देखील ठरणार आहे. तसेच K-6 हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्याम माध्यमातून एक असाही संदेश जातो की, सागरी सीमा आणि धोरणात्मक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी भारताची किती मोठी तयारी सुरू आहे ते. ज्यामुळे जागतिक स्तरावरही भारताचा प्रभाव वाढेल.

Tags: india missileK-6 missileK-6 missile is more deadly than BrahmosK-6 missile speedTOP NEWSWhat is the K-6 hypersonic missile
ShareTweetSendShare

Related News

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही
राष्ट्रीय

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार
राष्ट्रीय

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे
इतिहास,संस्कृती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती
इतिहास,संस्कृती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना
राष्ट्रीय

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

Latest News

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

दोन नव्या युद्धनौकांचा नौदलात समावेश; भारताची समुद्रीय सुरक्षा अधिक मजबूत सोबतच सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरही

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

शताब्दी वर्षात संघ देशभरात गृह संवाद अभियान राबवणार, १ लाख हिंदु संमेलने आयोजित करणार

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.