Wednesday, July 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
The Marathi News
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
No Result
View All Result
The Marathi News
No Result
View All Result

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
  • लाईफस्टाइल
Home राष्ट्रीय

कट्टरपंथीय टुर गाईडकडून परदेशी पर्यटकांवर अतिप्रसंगाचे वाढते प्रकार समोर

News Desk by News Desk
Jul 2, 2025, 09:33 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामला गेलेल्या महाराष्ट्रातील एका ७० वर्षीय महिला पर्यटकावर ११ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथील रहिवासी झुबेर अहमदने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. . जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्हा न्यायालयाने या बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना २७ जून २०२५ रोजी आरोपी झुबेर अहमदचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

खालील लेखामध्ये  २००४ ते २०२० पर्यंत भारतातील विविध राज्यांमध्ये मुस्लिमांकडून महिला पर्यटकांवर झालेल्या बलात्कार तसेच छळाच्या ८ प्रमुख गंभीर घटनांचा सविस्तरपणे आढावा घेतला आहे.

१. पहलगाममध्ये ७० वर्षीय वृद्ध पर्यटक महिलेवर बलात्कार

११ एप्रिल २०२५ रोजी, महाराष्ट्रातील ७० वर्षीय महिला पर्यटकावर पहलगाम येथील रहिवासी झुबैर अहमदने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना समोर आली होती. झुबैर अहमदने महिलेच्या खोलीत प्रवेश केला, तिचे तोंड चादरने बांधले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर आरोपी झुबैर अहमदविरुद्ध बीएनएसच्या कलम ६४ आणि ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एका न्यायालयाने २७ जून २०२५ आरोपी झुबेर अहमदचा जामीन अर्ज फेटाळत टिपण्णी केली आहे. ” ही घटना समाजात पसरलेल्या विकृत आणि आजारी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे समाजाच्या नैतिक रचनेला हानी पोहोचते.ती जेष्ठ महिला पहलगाम येथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आली होती. मात्र या घटनेनंतर तिला आयुष्यभराचे दुःख घेऊन घरी परतावे लागणार आहे.

या घटनेनंतर पहलगाम मधील बुद्धिजीवी लोकांनी या घटनेचा निषेध करत काश्मिरीयत आणि तेथील आदरातिथ्याच्या महान संस्कृतीवरील कलंक असे संबोधले आहे.

२. आग्रा किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या परदेशी महिला पर्यटकाचा विनयभंग
१६ एप्रिल २०२५ रोजी लिथुआनियातील एक महिला पर्यटक आग्रा किल्ला पाहण्यासाठी गेली होती, तेव्हा मोहम्मद मिजान नावाच्या एका पर्यटकाने महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला. या घटनेनंतर, परदेशी महिलेने हरियाणा पर्यटन पोलिसांकडे तक्रार केली असता आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही  महिला पर्यटक आग्रा किल्ल्यात प्रवेश करताच, हरियाणातील या मिजान  नावाच्या एका सेल्समन असलेल्या तरुणाने तिचा पाठलाग सुरू केला. तरुणाने तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. महिलेने एक-दोनदा दुर्लक्ष केले, परंतु तरुणाचे कृत्य थांबले नाही. मात्र  त्याने महिलेची गंभीरपणे छेडछाड करताना तिच्या जोडीदाराने हे सर्व पाहिले तेव्हा त्याने त्या तरुणाला पकडले. तेव्हा आरोपीने त्याच्याशी भांडण सुरू केले. गोंधळ झाल्यावर तरुणाला पकडण्यात आले. पर्यटन पोलिस घटनास्थळी पोहोचले. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पर्यटन पोलिस स्टेशनच्या प्रभारी रुबी सिंह यांनी सांगितले आहे. हरियाणाचा रहिवासी असलेला आरोपी निजान याला या घटनेनंतर तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

३. ईदच्या रात्री असलमचा जर्मन महिलेवर बलात्कार
मोहम्मद अब्दुल असलमने ३१ मार्च २०२५ रोजी ईदच्या दिवशी हैदराबादमधील मामिदिपल्ली येथे २५ वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी मोहम्मद अब्दुल असलम पीडितेला पहाडीशरीफमधील मामिदिपल्ली येथे घेऊन गेला होता.

सुरवातीला आरोपीने जर्मन महिलेला आणि तिच्या पुरुष मित्राला हैदराबादची फेरफटका मारण्याचे आमिष दाखवले, त्यानंतर त्याने पुरुष मित्राला मध्येच उतरवून महिलेला एका निर्जन भागात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

 हे दोन्ही जर्मन पर्यटक मीरपेटमधील त्यांच्या भारतीय मित्राच्या निमंत्रणावरून भारतात आले होते. त्यांनी भारतातील इतर काही शहरांनाही भेट दिली होती आणि गुरुवारी परत जाणार  होते.

आरोपीचे नाव मोहम्मद अब्दुल असलम असे आहे, जो स्विफ्ट डिझायर कार चालवत होता. त्याच्याशिवाय कारमध्ये आणखी ५ लोक होते. जे सर्व अल्पवयीन होते आणि त्यांचे वय ९ ते १६ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर पीडितेने कारमधून उडी मारून तिचा जीव वाचवला.

घटनेच्या १२ तासांच्या याकुतपुरा येथील त्याच्या निवासस्थानाबाहेर मोहम्मद अब्दुल असलमला १ एप्रिल २०२५ रोजी पोलिसांनी अटक केली असून बीएनएसच्या कलम ६४(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नंतर त्याला  न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

४. रशियन पर्यटकावर बलात्कार केल्याप्रकरणी दोन मुस्लिम तरुणांना अटक

रशियन महिला गोव्यात एका हॉटेलमध्ये राहत होती.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या आरोपीने रशियन महिलेच्या खोलीत प्रवेश केला आणि खोली स्वच्छ करण्याचा बहाणा केला. तो हॉटेलने नियुक्त केलेला सफाई कर्मचारी असल्याने, त्या बेफिकीर महिलेने त्याला आत येऊ दिले. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास, आणि थकलेली पर्यटक झोपी गेली. पीडिता त्यावेळी दारूच्या नशेत होती त्यामुळे तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचे कळले नाही. त्यानंतर, दुसरा आरोपी खोलीत घुसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला. तोपर्यंत, पीडिता शुद्धीवर आली आणि मदतीसाठी ओरडली.

उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) निधिन वलसन यांनी माहिती दिली की आरोपींची ओळख सखिल अन्सारी (२३) आणि सयुमधीन अन्सारी (२३) अशी झाली आहे. दोघेही नेपाळच्या बर्दिया येथील रहिवासी होते आणि गोव्यातील कलंगुट येथे हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करत होते.

गोवा पोलिसांनी नेपाळमधील या दोन मुस्लिम स्थलांतरितांना अटक केली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात हे दोघेही जामिनावर बाहेर होते आणि त्यांच्या जामिनाच्या अटी मोडून गोव्यात पळून गेले होते, असे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारचे वृत्त समोर आले आहे.

Nepali Muslims Sakhil & Sayumdhin Ansari rape intoxicated Russian tourist in Goa

५. मुंबईत लाईव्ह शोच्या शूटिंगदरम्यान कोरियन व्हीलॉगरचे लैंगिक शोषण

२९ नोव्हेंबर २०२२ रोजी, मुंबई, महाराष्ट्र येथे, मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब अन्सारी यांनी दक्षिण कोरियन युट्यूबर आणि व्हीलॉगर केली यांच्याशी सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केले. हे निर्लज्ज कृत्य केलीच्या कॅमेऱ्यातही कैद झाले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.

ऑनलाइन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, काल रात्री संबंधित युट्यूबर “नाही, नाही” असे ओरडत असताना आरोपींपैकी एक तिचा हात धरून ओढताना दिसत आहे.

खार पोलिसांनी दक्षिण कोरियाच्या युट्यूबर प्रकरणात कारवाई केली आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करून मोबिन चांद मोहम्मद शेख (१९) आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी (२०) यांना अटक केली होती.

६. जपानी पर्यटकावर बलात्कार केल्याप्रकरणी अब्दुल-अर्शदला  प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा

 ८ फेब्रुवारी २०१५ रोजी जयपूरमध्ये एका जपानी पर्यटकावर बलात्कार झाल्या प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये, भारतात भेट देण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय जपानी पर्यटकाला जयपूरमध्ये एका गाईड भेटला. तिने गाईडला हॉटेलमध्ये सोडण्यास सांगितले. मात्र गाईड जपानी पर्यटकाला त्याच्या बाईकवर हॉटेलऐवजी ६० किलोमीटर अंतरावर एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे त्याने त्याच्या साथीदारांसह पर्यटकावर बलात्कार केला. या लोकांनी पर्यटक महिलेचे आयफोन आणि चार हजार रुपयेही लुटले.

जयपूरमधील एका जलदगती न्यायालयाने  जपानी पर्यटकावर बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पर्यटक मार्गदर्शकासह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. एडीजे (एफटी) न्यायालयाने मुख्य आरोपी अजितसिंग चौधरी उर्फ ​​जीतराम याच्यासह अब्दुल वाहिद, अर्शद आणि इतर आरोपींना आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत दोषी ठरवले आहे.

७. पार्क स्ट्रीट सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कादर खानला अटक

 ५ फेब्रुवारी २०१२ च्या रात्री सुझेट जॉर्डनवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. दोन मुलांची आई असलेल्या या महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यांनी पीडितेला पार्क स्ट्रीट परिसरातील एका नाईट क्लबमधून घरी सोडण्याची ऑफर दिली होती.

मार्च २०१५ मध्ये सुझेट जॉर्डनचा मेंदूच्या तापाने मृत्यू झाला होता.जेव्हा  तिचे वय सुमारे ४० वर्ष होते.बलात्काराच्या घटनेनंतर जवळपास ४ वर्षांनी सुझेट जॉर्डनच्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी कादर खानला कोलकाता पोलिसांनी ३० सप्टेंबर २०१६ रोजी दिल्ली येथून अटक केली आहे. १० डिसेंबर २०१५ रोजी, शहर सत्र न्यायालयाने रुमान खान, नासिर खान आणि इतर आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती.

८. रफिक अहमदकडून  काश्मीरमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेवर बलात्कार

३७ वर्षीय ऑस्ट्रेलियन पर्यटक कार्मेन ग्रीनट्री नावाच्या महिलेला  २००४ मध्ये २२ वर्षांच्या वयात काश्मीरमध्ये एका बोटीवर बंदिवान बनवण्यात आले होते. २७ मे २००४ रोजी, कार्मेन ग्रीनट्रीला रफिक अहमद दुंडू नावाच्या काश्मिरी पुरूषाने उचलून नेले. या काळात रफिक अहमदने कार्मेन ग्रीनट्रीवर बलात्कार केलाऑस्ट्रेलियन महिला कार्मेन ग्रीनट्रीला दोन महिने ओलीस ठेवून दररोज रात्री बलात्कार करण्यात आला. ७ जुलै २०२० रोजी पीडितेने स्वतः एका पुस्तकात हे उघड केले आहे. .

ही घटना समोर आल्यानंतर रफिक अहमद दुंडूला अटक करण्यात आली आणि सहा महिन्यांसाठी तुरुंगात पाठवण्यात आले. रफिक अहमद दुंडूला कधीही दोषी ठरवण्यात आले नाही कारण ग्रीनट्री त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी कधीच परत भारतात आली नाही.

ग्रीन ट्री हिने तपशीलवार या घटनेबाबत सांगितले आहे. ती म्हणते कि, “त्याने माझ्यावर किती वेळा बलात्कार केला हे मला कळले नाही. मी इतकी ब्लॅक होते की  मला आता बहुतेक [हल्ले] आता आठवत नाहीत.

तसेच डंडूने तिच्या खात्यातून तिचे सर्व पैसे काढले आणि हाऊसबोटवर फोन वापरून तिच्या कुटुंबाला अधिक पैसे पाठवण्यासाठी कॉल करण्यास भाग पाडले.

ग्रीनट्रीने  पारंपारिक काश्मिरी पोशाख घालण्यास आणि दिवसातून पाच वेळा नमाज पढणे भाग पाडले गेले. तिला कुराण देखील वाचण्यास भाग पाडले गेले.अखेर तिच्या मैत्रिणीने  दिल्लीतील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आणि  स्थानिक पोलिसांना मदत करण्यात आली, असे ग्रीनट्री म्हणाली.पोलिसांनी प्रथम तिला वाचवले आणि नंतर तिचे कागदपत्रे आणि पासपोर्ट परत मिळवण्यासाठी पुन्हा हाऊसबोटवर गेले, असे तिने आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

एकीकडे “वसुधैव कुटुंबकम” असे म्हणत आपण भारतीय देशात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करतो, मात्र असे कट्टरपंथीय नराधम मिळणाऱ्या कुठल्याही संधीचा फायदा न सोडता अशी लाजिरवाणी कृत्ये करतात. बलात्कारासारख्या घटनांमुळे  देशातील  कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले जातेच. पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा खराब होते.अत्यंत लज्जास्पद आणि भयानक घटनांमुळे देशातील महिलांसोबतच आता परदेशी महिलाही भारतात असुरक्षित आहेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अश्या कट्टरपंथीय गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा देणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे भविष्यात अश्या विघातक कृत्यांना लगाम बसू शकेल.

Tags: foreignersrape casesTOP NEWStourist guide
ShareTweetSendShare

Related News

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे
इतिहास,संस्कृती

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा
राज्य

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती
इतिहास,संस्कृती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना
राष्ट्रीय

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका
राष्ट्रीय

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

Latest News

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘क्रांतिकारी उडीची’ ११५ वर्षे

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

कारगिल युद्धाचा शेरशाह – विक्रम बत्रा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

आषाढी वारी: भक्ती आणि श्रद्धेचा अलौकिक सोहळा

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

लक्ष्मीबाई केळकर तथा मावशी केळकर यांची जयंती

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

ABVP: विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

भारतीय किसान संघाची आजवरची शेतकऱ्यांसाठीची भूमिका

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वदेशी विचारसरणीचा संकल्प भारताला अत्युच्च स्थानावर पोचवेल (पंच परिवर्तन भाग -3 )

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

ड्रग्जतस्करीला ‘मकोका’ लागणार; ड्रग्जचा विळखा महाराष्ट्र पोखरतोय?

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

पंढरीच्या वारीत समाजविघातक प्रवृत्तींकडून धर्मपरिवर्तनाचे प्रयत्न

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.