अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण आणि त्याला आहारी जात असलेली तरुणाई ह्या गंभीर विषयाचे महत्व ओळखत ड्रग तस्करी करणाऱ्यांना मकोका लावण्याचा निर्णय महाराष्ट्रातील सरकारने घेतला आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक या अधिवेशनात मांडले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे.
मकोकाची गरज का ?
1. एमडी ड्रग्ज हा महाराष्ट्र आणि देशासाठी गंभीर प्रश्न बनला आहे.
2. महाराष्ट्रात तस्करांची संख्या वाढली आहे
3. मेफेड्रॉन तस्करीत महाराष्ट्र सर्वात मोठे केंद्र बनले आहे.
4. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रॉनच्या एकूण ७६ टक्के प्रकरणांपैकी १ हजार ४८६ प्रकरणे ही राज्यातील आहेत.
5. मागील पाच वर्षांत राज्यात जवळपास सव्वापाच हजार किलो अमली पदार्थ (एमडी) आणि कच्चा माल जप्त करण्यात आला आहे,
6. तस्करीच्या आरोपांखाली ११६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
7. फक्त युवकांमध्येच नाहीतर शाळकरी मुलांनाही या एमडीचे व्यसन लागले आहे.
8. मुंबई, पुण्यासह भंडारा, गोंदियासारख्या ग्रामीण भागांमध्येही याची वाढ झाली आहे.
9. तस्करीमध्ये सामील असणाऱ्यांना अटक झाली तरी वर्षभरात जामीन मिळतो. सुटल्यानंतर ते पुन्हा तेच उद्योग करतात, त्यामुळे त्यांच्यावर मकोकासारखी कारवाई होणे अतिशय आवश्यक आहे.
Devendra Fadnavis : एमडी ड्रग्सची गल्लीतली गंगा आता विधिमंडळात
महाराष्ट्रात ड्रग्जचा वाढता विळखा
1.ओपियॉईड, कॅनाबीसचं व्यसन असणाऱ्यांच्या संख्येत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या पाच नंबरात आहे.
2.धूर, वाफ किंवा एरोसोल स्प्रेच्या माध्यमातून किंवा तोंडावाटे घेतलं जातं.
3.इन्हेल (Inhale ) किंवा इंजेक्शनद्वारे सेवन केले जाणारे अंमली पदार्थ.
4.सिडेटिव्ज किंवा वेदना शामक औषधं.
5.गांजा थेट मेंदूवर आणि मानसिकतेवर परिणाम करतो.
6.आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, ताणतणाव आणि मानसिक आजारांत व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक.
7.अंमली पदार्थांची सहज उपलब्धता व्यसनाधीनता वाढण्यास कारणीभूत
8.शरीरसौष्ठवपटूंच्या ‘मसल्स इनहान्सर’मध्येही अमली पदार्थांची भेसळ आढळून येते.
https://marathi.freepressjournal.in/maharashtra/mcoca-for-drug-traffickers-fadnavis-announcement
https://marathi.ndtv.com/maharashtra/maharashtra-assembly-monsoon-session-2025-narcotics-cases-action-under-mcoca-says-cm-devendra-fadnavis-8812245
समाजात व्यसनाधीनता का वाढत्ये आहे.
1.व्यसनाकडे ओढले जाण्याचा किंवा अमली पदार्थांच्या आहारी जाणे हे खूप लहान वयात सुरु झाल्याचे दिसून येते. काही वर्षांपूर्वी हे प्रमाण ३० होते आता १३ -१४ वर्षांपर्यंत खाली आले आहेत.
2.सिगारेट ओढणे, दारू पिणे, ड्रग्ज घेणे या सर्वाला आता खूप सोशल अॅक्सेप्टन्स म्हणजेच सामाजिक स्वीकार्यता मिळू लागली आहे
3.पूर्वी दारू पिणार्या माणसाकडे पाहण्याचा लोकांचा द़ृष्टिकोन नकारात्मक असायचा; पण आता याउलट स्थिती दिसते. जो दारू पीत नाही तो काही तरी चुकीचे करतोय किंवा पुढारलेल्या जगापासून लांब आहे, असा द़ृष्टिकोन आज मोठ्या प्रमाणावर दिसून येतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
4.मादक पदार्थांचे सेवन करणे स्टेटस सिम्बॉल बनले आहे.
5.ड्रगविक्री करणारी तरुणाई एका बुद्धिजीवी तरुणाला लाखो रुपयांची बचत करण्यासाठी जिथे आयुष्याची चाळीसी उलटते, तिथे ही मिसरुडं फुटलेली मुले अवघ्या विशीत झटपट मार्गाने लाखो रुपये कमवू लागतात. आणि डोळ्यावर आलेली ही चकाकी सद्सद्विवेक बुद्धीला हरवून टाकते.
https://marathi.abplive.com/news/maharashtra/types-of-drugs-in-india-what-are-symptoms-of-drug-users-punishment-for-taking-drugs-detail-information-of-pune-drug-case-maharashtra-marathi-news-1258220
गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात समोर आलेली ड्रग तस्करीची काही चक्रावून टाकणारी प्रकरणे, ज्यावरून हे जाळे कुठपर्यंत पसरले आहे हे लक्षात येईल.
१. एप्रिल २०२५ मध्ये तुळजापूर मंदिरात ड्रग्ज तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात मागील 3 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
https://www.marathijagran.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/dharashiv-drug-case-drug-racket-in-tuljapur-priest-political-activists-involved-in-drug-racket-64984
२. झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील काही पान टपऱ्यांवर सहज या ‘बटन’ गोळ्या मिळून जातात. त्यांच्या सेवनानंतर कोणताही इतर व्यसनांप्रमाणे तोंडाला वास येत नसल्यामुळे तरुणाई त्याकडे आकर्षित होत असल्याचे दिसून आले आहे.
https://www.lokmat.com/chhatrapati-sambhajinagar/shocking-use-sleeping-pills-drugs-young-people/
३. पुण्यात सापडलेल्या मेफेड्रॉन ड्रग्जचे रॅकेट हे दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याचे पोलीस कारवाईत उघड झालं आहे. यापैकी काही ड्रग्ज हे लंडनलाही कुरिअरने पाठवल्याचेही समोर आले आहे.
४. ड्रग्स माफिया असलेला ललित पाटीलला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले होते. तो मुख्यतः मेफेड्रॉनची निर्मिती आणि विक्रीमध्ये सामील होता. मात्र असे अनेक ललित पाटील केमिकल कंपन्यांच्या बुरख्याआड काम करत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील एमआयडीसीमधील या केमिकल कंपन्या मेफेड्रॉन निर्मीतीची आणि पर्यायाने ड्रग माफियांची केंद्रं बनली आहेत.
https://www.tv9marathi.com/maharashtra/pune-police-action-in-lalit-patil-drugs-case-two-employees-dismissed-from-service-marathi-news-1228745.html
५. मुंबईच्या मीरा-भाईंदर परिसरात ‘ड्रग्ज क्वीन’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सबिना शेखला गुन्हे शाखेने कोकेन आणि २२.३३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह अटक केल्याची बातमी मागच्या वर्षी समोर आली होती.
मीरा-भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१ (काशिमीरा) च्या या कारवाईत एकूण १४.८६८ किलो कोकेन जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे २२.३३ कोटी रुपये आहे.
https://mpcg.ndtv.in/india/drug-trafficking-racket-busted-in-maharashtra-drug-queen-sabina-arrested-cocaine-worth-rs-22-33-crore-recovered-8189626
६. मागच्याच वर्षी देशातील सर्वात मोठं ड्रग्स रॅकेट पुणे पोलिसांनी उघड केले होते. आतापर्यंतचे सर्वात जास्त किंमतीचे तब्बल 4000 कोटींचे ड्रग्ज पुण्यात जप्त करण्यात आले होते.
https://marathi.abplive.com/news/pune/pune-drugs-racket-pune-drugs-racket-to-be-investigated-by-nia-pune-drugs-mephedrone-1258668
७. एप्रिल २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट दोन पोलिस आणि एक कस्टमचा अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह चालवत होते. नवी मुंबई गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करत 10 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 पोलीस हवालदार, 1 कस्टम अधीक्षक आणि अन्य सहा आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी हायड्रो गांजा जप्त होता आणि एकूण जप्त मालमत्ता ही जवळपास 74 लाखांची होती.
https://marathi.ndtv.com/crime/navi-mumbai-busts-international-drug-racket-2-police-constables-1-customs-officer-arrested-8286787
८. वांद्रयामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्षाने दोन वेगवेगळ्या भागांमधून अंमली पदार्थ तस्करांना अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल १.३५ कोटी रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज यावेळी जप्त करण्यात होते. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘कोडीन’ आधारित खोकला सिरपच्या १ हजार, ४०० बाटल्या आणि ‘नायट्राझेपम’च्या सहा हजार यावेळी गोळ्या जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
https://www.mahamtb.com//Encyc/2022/12/20/Drugs-seized-in-Mumbai.html#/google_vignette
या ड्रॅग तस्करीशी संबंधित काहीच बातम्या आहेत, प्रत्यक्षातल्या घटना आणि त्यांची झालेली नोंद ही धक्कादायक आकड्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमधून ड्रग तस्करीशी संबधित प्रकरणे समोर आली आहेत.
मालेगाव आणि इतर मुस्लिम बहुल भागांमध्ये ड्रग्सच्या तस्करीत सहभागी होणारे लोक दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आहे. त्यांचा यामध्ये सहभाग चिंताजनक आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, यामध्ये महाराष्ट्रात येऊन वसलेल्या नायजेरियन टोळ्यांचाही यामध्ये मोठा सहभाग आहे. नायजेरियन नागरिकांनी आपले जाळे पूर्ण अभ्यास करून तयार केले असून ते अत्यंत गुप्तपणे कार्यरत आहेत. ते कोकेन, एम.डी, एल.एस.डी व एम.डी.एम.ए हे अमली पदार्थ विकतात. त्यांचे या व्यवसायातील मास्टरमाइंड हे नायजेरिया किंवा आफ्रिकन देशात बसलेले आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे.
हे मादक पदार्थ महाराष्ट्रात पोचतात कसे ?
शेजारील नापाक ’ राष्ट्रातून पंजाब(अमृतसर)-दिल्ली-भोपाळ या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या ट्रक, कंटेनरमधून लपून ही उत्तेजके नाशिकमध्ये येतात, तर काही समुद्रमार्गातून सरहद्द ओलांडून मुंबई,आणि इतर राज्यामध्ये पोचतात. अजूनही इतर अवैध वाहतूकीचे मार्ग यातले व्यापारी शोधतातच.
वस्तुतः, दारू, ड्रग्ज, अफू, चरस, गांजा यामुळे मिळणारा आनंद अत्यंत क्षणिक असतो, तात्कालिक असतो. या क्षणभराच्या आनंदासाठी इतकी मोठी किंमत देणे आपल्या कारकिर्दीसाठी, पुढील आयुष्यासाठी धोकादायक ठरू शकते. व्यसनाधीनतेमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होण्याबरोबरच करिअरचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. खाजगी तसेच कौटुंबिक आयुष्यावर याचे अत्यंत प्रतिकूल दुष्परिणाम होतात.मात्र अमली पदार्थांचा सरहद्द पार करून होणारा हा व्यापार सशक्त तरुणाईचे आयुष्य पोखरतो आहे, हे भयावह वास्तव आहे. आणि त्यावर वचक बसण्यासाठी मकोका सारख्या कडक कारवाईची आणि त्याचबरोबर तरुणाईला या अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढू शकेल अश्या संस्कार मूल्यांची आणि योग्य त्या शिस्तीचा अवलंब घरोघरी होण्याची आवश्यकता आहे.