आयएनएस विंध्यगिरी’ या युद्धनौकेचे आज कोलकात्यामध्ये भारताच्या राष्ट्रपती आणि देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुख द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जलावतरण करण्यात आले. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. या वेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. ही युद्धनौका कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने तयार केली आहे. ‘प्रोजेक्ट १७ अल्फा’ अंतर्गत बांधण्यात आलेल्या ‘शिवालिक’ श्रेणीतील ‘आयएनएस विंध्यगिरी’ ही सहावी युद्धनौका आहे.आकाश, जमीन आणि पाण्याखालून होणारे हल्ले परतवून लावण्याची क्षमता विंध्यगिरी या युद्धनौकेत आहे.अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज झालेल्या या युद्धनौकेच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ही विंध्यगिरी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली आहे.
आएनएस विंध्यगिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करता येणार असून दोन हेलिकॉप्टरही या युद्धनौकेवर असतील. त्यामुळे आता चीन आणि पाकिस्तानला धडकी भरण्याची शक्यता आहे.
आयएनएस विंध्यगिरीची खास वैशिठ्ये
कर्नाटकातील पर्वतरांगेवरून ‘विंध्यगिरी’ हे नाव ठेवण्यात आले आहे.
आयएनएस विंध्यगिरी ही स्वदेशी प्रकल्प 17-A फ्रिगेटची सहावी युद्धनौका आहे.
ही नौका 28 नॉट्सच्या वेगाने म्हणजे समुद्राच्या लाटांवर ताशी 52 किमी वेगाने धावू शकते
ती 6 हजार 670 टन दारूगोळा आणि इतर वस्तू सोबत घेऊन जाऊ शकते.
आयएनएस विंध्यगिरी बराक-8 क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम आहे.
भारताचे प्राणघातक क्षेपणास्त्र ब्रह्मोस हे युद्धनौकेवरूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.
आयएनएस विंध्यगिरी अत्याधुनिक रडार यंत्रणा आणि पाणबुडीविरोधी शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.
150 मीटर लांब आणि 37 मीटर उंचीची ही युद्धनौका भारतासाठी समुद्रातील सर्वात शक्तिशाली संरक्षक ठरणार आहे.